ETV Bharat / state

Mumbai Development Project : केसरकर साकारणार पंतप्रधानांच्या स्वप्नातील मुंबई, 'निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा' प्रकल्पाचे भूमिपूजन - निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा

मुंबईला महाराष्ट्र पासुन तोडण्याचा घाट घातल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. 'निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा' या (Nirdhar Sarkarcha Kayapalat Mumbai Cha) अंतर्गत 500 प्रकल्पाचे भूमिपूजन (ground breaking ceremony of 500 projects) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले.

Mumbai Development Project
निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा
author img

By

Published : Dec 9, 2022, 1:25 PM IST

मुंबई : मुंबईला महाराष्ट्र पासुन तोडण्याचा घाट घातल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पंतप्रधानांच्या स्वप्नातील मुंबई असल्याचे म्हटले आहे. 'निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा' (Nirdhar Sarkarcha Kayapalat Mumbai Cha) या अंतर्गत 500 प्रकल्पाचे भूमिपूजन (ground breaking ceremony of 500 projects) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

निर्धार सरकारचा, कायापालट मुंबईचा : राज्याला असे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री लाभणे शहराचे भाग्य आहे. गुगलवरती सर्वाधिक सर्चमध्ये एक नंबर आता मुख्यमंत्री शिंदे यांचा आहे. कारण तुम्ही जो चमत्कार महाराष्ट्र मध्ये घडवला, त्याच्यामुळे महाराष्ट्र बदलतोय. मुंबई बदलतेय आणि त्याच्यामुळे आमची टॅगलाईन सुद्धा निर्धार सरकारचा, कायापालट मुंबईचा, अशी आहे. मुंबईचा खऱ्या अर्थाने आम्हाला कायापालट करायचा आहे. मुंबईची जी फास्ट ग्लोरी आहे, महाराष्ट्र मुंबईचा जो एक अतिशय दैदिप्यमान असे जे स्थान आहे ते पुन्हा एकदा निर्माण करायचा आहे. मुंबईला भ्रष्टाचारातून बाहेर काढायचा आहे, जेव्हा गतिमान सरकार असते त्याला गतिमान निर्णय घेतले जातात. हे निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी असतात, असे केसरकर म्हणाले.

कोळीवाड्यातील रोजगारासाठी पुढाकार : मुंबई केवळ स्वच्छ आणि सौंदर्यकरण करून हे सरकार थांबलेले नाही. मुंबई आरोग्यदायी असली पाहिजे, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. मुंबई लाईव्ह झाली पाहिजे. साउथ मुंबईमध्ये सर्व महत्त्वाची कार्यालय या विभाग आहेत. परंतु, संध्याकाळच्या वेळेला साउथ मुंबई लवकर झोपी जाते. त्यामुळे काला घोडा, बाणगंगा फॅशन स्ट्रीट वर संध्याकाळच्या सुमारास पर्यटक कसे येतील यासाठी आमचा प्रयत्न राहील. मात्र, नाईट लाईफच्या मागे न लागता, पुन्हा एकदा पर्यटन स्थळ कार्यरत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे केसरकर यांनी सांगत आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून कोळीवाड्यातील रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार आहोत, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

12000 कोटीची मागणी : एकीकडे मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्याचा घाट घातल्याचे आरोप विरोधक करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईला सर्वोत्कृष्ट बनवायचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने सरकारने प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्र हा स्वच्छ बनवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी 12000 कोटीची मागणी केली होती. एकही रुपया न कापता 12000 कोटी रुपये पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला पाठवले. एक हे आर्थिक गिफ्ट होत. केंद्र शासनाने राज्य शासन एकमेकांच्या हातात हात घालून, संपूर्ण मुंबईचा कायापालट करत आहेत. महाराष्ट्र नेहमी बलवान राहिलेला आहे आणि नेहमी बलवान राहणार आहे. परंतु, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा खोटा प्रचार करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप केसरकर यांनी केला.

दिवस रात्र सेवा करणार : महाराष्ट्रातील गुंतवणूकदार मुंबई बाहेर गेले, असा आरोप होतो आहे. परंतु येत्या सहा महिन्यांमध्ये मोठी गुंतवणूक मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये येईल. मुंबईच्या विकासासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कोकणातून मुंबईची काळजी घेण्यासाठी पालकमंत्री म्हणून नेमले आहे. पालकमंत्र्यांनी वेळ ही द्यायला हवे, असा टोला आदित्य ठाकरे यांना केसरकर यांनी लगावला. मुंबई वैभवशाली शहर असून गरिबांपासून श्रीमंत माणसाला न्याय देत आणि त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही जाऊ आमचे दिवस रात्र सेवा करणार असून पोलीस, सफाई कामगारांना हक्काची घर दिली जातील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रामधील असलेले स्मारकाला केंद्राची परवानगी घेऊन याच ठिकाणी अतिशय जाज्वल्य पणे उभा राहील, असे केसरकर म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.