मुंबई: राज्यातील अडीच हजार ग्रामपचांयतीचे भविष्य आज ठरणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी ७४ टक्के मतदान झाले आहे. या ग्रामपंचायतींचे निकाल आज लागणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब विखे पाटील, आमदार रोहित पवार, मंत्री धनंजय मुंडे अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Live Updates
- बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची घोडदौड सुरू आहे. 65 ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये अजित पवार गट आघाडीवर आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे सर्वाधिक पाच ठिकाणी वर्चस्व आहे. जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचा बोलबाला दिसून आलाय. आठही ग्रामपंचायती काँग्रेस आमदारांच्या क्षेत्रात होत्या हे विशेष. राजुरा तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला रामपूरमध्ये यश मिळाले, तर सास्तीमध्ये भाजपने सत्ता मिळविली. आर्वी गावात काँग्रेसने सत्ता राखली. वरोरा तालुक्यातील सालोरी येथे काँग्रेस तर सावली तालुक्यातील मोखाळा येथे अपक्षाने बाजी मारली. आज सकाळपासून मतमोजणी केंद्रावर कार्यकर्ते आणि उमेदवारांची गर्दी दिसून आली. रामपूर येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर राजुरा तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
- बारामतीमधील २४ ग्रामपंचायती अजित पवार गटाच्या ताब्यात आल्या आहेत. तर भाजपानं २ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे.
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अपडेट*
एकूण ग्रामपंचायत: 16
निकाल जाहीर: 12
भाजप: 3
शिंदे गट: 3
उद्धव ठाकरे गट: 1
अजित पवार गट: 3
शरद पवार गट:
काँग्रेस: 1
मनसे:
इतर: 1
- नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे पारडे जड
- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचा बावडा ग्रामपंचायतीत दणदणीत विजय झाला.
17 पैकी 14 चे निकाल जाहीर, सरपंच पदासह 10 जागा भाजपकडे
इंदापूर तालुक्यात 3 ग्रामपंयतीवर भाजपा तर 3 जागांवर राष्ट्रवादी विजय
3 ग्रामपंचायतीत हर्षवर्धन पाटील तर 3 ग्रामपंचायतीत आमगार दत्तात्रय भरणे गटाने जिंकला (अजित पवार गट)
इंदापूर तालुक्यात 6 ग्रामपंचायतीत महायुतीचा विजय
- छत्रपती संभाजीनगरमधील चार ग्रामपंचायतीचे निकाल लागले आहेत.
खुलताबाद - चार ग्रामपंचायत निकाल
२ अजित पवार राष्ट्रवादी.. (घोडेगाव, रसुलपुरा)
१ ठाकरे गट (तिसगाव तांडा)
१ काँग्रेस (तिसगाव)
- हवेली तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायची शरद पवार गटाने जिंकल्या आहेत. वाडेबोल्हाई, खामगाव मावळ, कोलवडी साष्टे या तिन्ही ग्रामपंचायतीत शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
- नंदुरबार जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायत निकाल हाती. करजोत:-सरपंच भाजप
- कुळावड : - भाजप
- जयनगर :- सरपंच :- भाजप
- कमरावद :- सरपंच :- भाजप
- वाघोदा : अपक्ष
- करजई :- अपक्ष
- गणोर :- अपक्ष ,शीतल रावताडे
- पिंप्री :- सरपंच :- भाजप
- गोगापूर :- अपक्ष
- लांबोळा :- अपक्ष
- लोंढारे :- भाजप
- दामळदा :- भाजप
- आडगाव :- अपक्ष
- लककडकोट :- भाजप
- विरपूर :- अपक्ष
- बिलाडी :- भाजप
- नाशिक ग्रामपंचायत निवडणुकीत पहिला निकाल हाती आला आहे. सुभाषनगर ग्रामपंचायतीवर अपक्षांनी झेंडा फडकाविला. देवळा तालुक्यातील मेशी ग्रामपंचायतीवर थेट सरपंचपदी ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख बापू शांताराम जाधव विजयी झाले आहेत.
- काटोल विधानसभा क्षेत्रातील बाजारगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख गटाची एक हाती सत्ता आली आहे.
- अकोले तालुका ग्रामपंचायत निवडणूक: सुगावा , ग्रामपंचायत निवडणुकीत, आणू प्रिता शिंदे , भाजप विजयी
- रेडे , ग्रामपंचायत निवडणूकित , राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रशांत बंदावणे , विजयी
- शितवंन , ग्रामपंचायत निवडणूकित , राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, संपत मोरे , विजयी
- अंबित , ग्रामपंचायत निवडणूकित , राष्ट्रवादी अजित पवार गटाचे , रोहिणी गिरे , विजयी
बारामती तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या सर्व ग्रामपंचायतींवर अजित पवार गटानं विजय मिळविला आहे.
- भोंडवेवाडी
- म्हसोबा नगर
- पवई माळ
- आंबी बुद्रुक
- पानसरे वाडी
- गाडीखेल
- जराडवाडी
- करंजे
- कुतवळवाडी
- दंडवाडी
- मगरवाडी
- निंबोडी
- बाजारगाव ग्राम पंचायतीसह राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आठ उमेदवार विजयी झाले आहेत.
- राहाता तालुका ग्रामपंचायत निवडणूक निकाल हाती आला आहे. दहेगाव कोर्हाळे ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाच्या जनसेवा ग्रामिण विकास आघाडीच्या पुनम संदीप डांगे या विजयी झाल्या आहेत.
- नागपूर जिल्ह्यात आलागोंदी ग्रामपंचायत भाजपाकडे तर बोरगाव येथे शरद पवार गटाकडे ग्रामपंचायतीची सत्ता आहे. नागपूर जिल्ह्यात 361 ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्यामध्ये भाजपा २ ग्रामपंचायतीत, शरद पवार गटाकडं २ ग्रामपंचायतीत आणि काँग्रेसनं एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजय मिळविला.
- नांदेड जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक व २५ जागेवर पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. यावेळी ८१.३७ टक्के मतदान झाले आहे.
- संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेब थोरातांचा वरचष्मा आहे. गुंजाळवाडी ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला. राहाता तालुक्यात महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा दबदबा दिसून आले. दहेगाव ग्रामपंचायतीत भाजपाचा विजय झाला. निमगावमध्ये भाजपची सत्ता कायम राहिली आहे.
उत्तर अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत हाती आलेल्या निकालात..
भाजप - 03
कॉग्रेस - 01
- बारामती तालुक्यातील काटेवाडी या ग्रामपंचायतीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. आजवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काटेवाडी ग्रामपंचायतवर वर्चस्व राहिले आहे. यंदा अजित पवार गटाचा उमेदवार विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाचा पाठिंबा असलेले पॅनल अशी लढत झाली. राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपासोबत असताना ग्रामपंचायतीचा निकाल काय लागतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 48 ग्रामपंचायतींचे सार्वत्रिक तर दहा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचे निकाल लागणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांना राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतलं आहे. त्यामुळे कुठल्याच राजकीय पक्षांच्या चिन्हावर न लढवल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, अजित पवार गटाचे आमदार माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, तर भाजपाचे आमदार माजी मंत्री संजय कुटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या तेराही तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
- बीड जिल्ह्यात जिल्ह्यात 186 ग्रामपंचायतपैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर 16 ग्रामपंचायतींनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. जिल्ह्यामध्ये आज 158 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होणार आहेत. सरपंच पदासाठी 531 उमेदवार रिंगणात आहेत.
- अहमदनगरमध्ये १७८ ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील यांची कट्टर राजकीय स्पर्धा आहे. त्यामुळे अहमदनरमध्ये ग्रामपंचायतीच्या निकालाकडं सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा-
- Gram Panchayat Election 2023 : मावळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुमाकूळ, 4 ग्रामपंचायत बिनविरोध तर 15 साठी मतदानाला सुरुवात; पाहा व्हिडिओ
- Gram Panchayat Election 2023 : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूनं?
- Gram Panchayat Elections 2023 : उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी