ETV Bharat / state

Governor Koshyari on Shivjayanti : शिवजयंती निमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवरायांना अभिवादन

author img

By

Published : Feb 19, 2022, 12:24 PM IST

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagatsingh Koshyari on Shivjayanti ) यांनी आज दादर शिवाजी पार्क येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti ) अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Governor's greetings to Chhatrapati Shivaji Maharaj on the occasion of Shiva Jayanti
शिवजयंती निमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवरायांना अभिवादन

मुंबई - छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagatsingh Koshyari on Shivjayanti ) यांनी आज दादर शिवाजी पार्क येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti ) अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, उपमहापौर अॅड सुहास वाडकर, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसान जाधव, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

सनई चौघडा वादकांना शाबासकी -

शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन चौथऱ्यावरून खाली येताना राज्यपालांनी सनई चौघडे वाजविणाऱ्या कलाकारांजवळ थांबून उत्तम वादन केल्याबद्दल त्यांना शाबासकी दिली व आपल्याकडून बक्षीस दिले. कार्यक्रमाचे आयोजन बृहन्मुंबई महानगर पालिका व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते.

Governor's greetings to Chhatrapati Shivaji Maharaj on the occasion of Shiva Jayanti
सनई चौघडा वादकांना शाबासकी

हेही वाचा - Shiwaji Maharaj Jayanti 2022 : किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा; शिवभक्तांची गर्दी

अभिवादन सोहळ्यानंतर राज्यपाल क्रीडा भवन येथे महानगरपालिकेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिले. यावेळी संगीत कला अकादमीतर्फे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल - मुख्यमंत्री

स्वराज्यावर अनेक संकटे आली. काही स्वकीय तर काही परकीयांकडून झाली. पण महाराज कधीच झुकले नाहीत. शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श आमच्या समोर आहे, तो घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. राज्यातील जनतेला शिवजन्म उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. ( Uddhav Thackeray greetings on Shivjayanti )

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. स्वराज्यावर अनेक संकटे आली. काही स्वकीयांची तर परकीयांची होती. पण महाराज कधी झुकले नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्व रयतेच्या हितासाठी केलेले कार्य, दूरदृष्टी याचे दाखले आजही दिले जातात. महाराजांचे वेगळेपण म्हणजे ते एक युगपुरुष होते. आदर्श राज्यकारभार, रणनिती अशी त्यांची दूरदृष्टी आपल्यासमोर आज उदाहरण आहे. त्यांचे आज्ञापत्र वाचले तर शिवराय किती प्रजादक्ष होते, याची कल्पना आल्याशिवाय राहात नाही. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, समयसूचकता ही वैशिष्ट्य आजच्या व्यवस्थापन शास्त्रालाही अभ्यासण्यासारखे आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवरायांची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन काम -

शिवराय सर्वांचे होते. स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी बांधलेल्या सेनेत अठरापगड जातींचे लोक होते. जात-धर्म-भाषा यांच्या भिंती ओलांडून शिवरायांवर प्रेम करणारे लोक होते. शिवरायांच्या युद्धनीतीमुळे भारतीय लष्कर त्यांना आपले दैवत मानतात, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करून आपण हा पराक्रमी इतिहास पुढील अनेक पिढ्यांच्या मार्गदर्शनासाठी जतन करण्याचे काम हाती घेतले आहे. शिवछत्रपतींची शिकवण डोळ्यासमोर ठेवून आमचे सरकार काम करीत आहे आणि ते पुढे देखील करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.