ETV Bharat / state

करोनाबाबत सातत्याने सावधगिरी बाळगा राज्यपालांचे आवाहन - News about Corona patient

कोरोनाबाबत सातत्याने सावधगिरी बाळगा असे आवाहन राज्यपालांनी केले आहे. ते अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने राजभवन येथे आयोजीत विविध क्षेत्रातील ३५ करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात कार्यक्रमात बोलत होते.

Governor's appeal to be constantly vigilant about Corona
करोनाबाबत सातत्याने सावधगिरी बाळगा राज्यपालांचे आवाहन
author img

By

Published : Feb 16, 2021, 7:52 PM IST

मुंबई - करोना संसर्ग देशात येऊन एक वर्ष होत आले आहे. करोनाचे संकट कधीपर्यंत चालेल हे कुणीही खात्रीने सांगू शकत नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी यापुढेही सातत्याने करोनाबद्दल सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने राजभवन येथे मंगळवारी विविध क्षेत्रातील ३५ करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र, केरळमध्ये रुग्ण वाढले -

करोनाच्या देशभरातील केसेस एकेवेळी दिवसाला ९५००० होत्या, त्या आता १५००० पेक्षा कमी झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र, केरळ यांसह काही राज्यात करोनाचे रुग्ण पुनश्च वाढत आहेत, याकडे लक्ष वेधून करोनासंदर्भात बेफिकीरीने न राहता सावधगिरी बाळगून परंतु निर्भयतेने काम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

कोरोना काळात चांगले काम -

जगाच्या तुलनेत भारतात करोना रुग्णांची तसेच बळींची संख्या कमी होती. देशातील समाज सेवक, शासकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मी यांनी करोना काळात अतिशय सुंदर काम केले व त्यांना देशातील दानशूर व्यक्तींनी चांगले सहकार्य केले. त्यामुळेच भारत करोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करू शकला असे राज्यपालांनी सांगितले.

यांची उपस्थिती -

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुनिता सुमन सिंह व प्रताप सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्र कुमार सिंह व्यासपीठावर यावेळी उपस्थित होते.

या कोरोना योद्धांचा सत्कार -

सायन इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. मोहन अच्युत जोशी, केईएमचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख, शुश्रुषा हॉस्पिटलचे डॉ हर्षद शाह, डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. विभा अग्रवाल, समाज सेवक इक्बाल इस्माईल ममदानी, रुग्णवाहिका चालक अनिल आदिवासी, उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, वडाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे यांसह इतर करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.