मुंबई - महिलांविरोधातील आक्षेपार्ह विधाने सरकारमधील मंत्र्यांना भोवणार असे दिसते. त्यांच्यावर कारवाईसाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील अशा मंत्र्यांवर कारवाई होणार असे त्यामुळे दिसत आहे. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संबंधित मंत्र्यांना समज देण्याची सूचना केली आहे.
![महिलांविरोधातील आक्षेपार्ह विधान सरकारमधील मंत्र्यांना भोवणार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-governover-on-cm-leatter-7209781_03122022145416_0312f_1670059456_128.jpg)
दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ माध्यमांसमोर बोलताना घसरली होती. त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (about Supriya Sule) यांच्या बाबत अर्वाच्च भाषा (Abdul Sattar used abusive language) होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटत ( Outrage across the state) आहेत. राष्ट्रवादीच्यावतीने ठिकठिकाणी सत्तारांच्या विरोधात आंदोलन केले होते.
मंत्री अब्दुल सत्तार काय म्हणाले : औरंगाबादमधील सिल्लोड येथे मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा असताना त्यानी वादग्रस्त वक्तव्य केले होते. अब्दुल सत्तार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला होता. सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का? असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. यावर बोलताना सत्तार यांची जीभ घसरली होती. सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करत 'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असे वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केले होते.
सत्तारांनी मागितली होती माफी : त्यांनी आपत्तीजनक टिप्पनी केल्यानंतरही त्यांना विचारणा झाल्या नंतरही ते अनेक वेळ वक्तव्यावर ठाम होते. मात्र राज्य भरात त्याचे पडसाद उमटायला लागले. शिंदे गटांच्या मंत्र्यांनी त्या बद्दल नाराजी वक्त केली तेव्हा मात्र सत्तारांनी याबाबत माफी मागितली आहे. माझी महिलांचा अवमान करण्याची इच्छा नाही. मुद्दाम तसे केले नाही. महिलांचा अवमान झाला असेल तर दिलगिरी वक्त करतो असे म्हणत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला होता.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुषमा अंधारेबाबत वादग्रस्त वक्तव्य -
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांना 'नटी' म्हणत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी होते. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांचा 'नटी' असा उल्लेख करत त्या वसारलेलं भांडं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
गुन्हा दाखल करण्याची मागणी - यामुळे राज्यभरातील सर्व महिलांचा अपमान झाला असून मंत्र्यांनी महिलांबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे निषेधार्ह बाब आहे. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई अशी मागणी करण्यात आली आली.