ETV Bharat / state

राज्यपाल कोश्यारींची सत्ता स्थापनेसाठी भाजपला विचारणा

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामध्ये भाजपला 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. तसेच मनसेला एक जागा आणि अपक्षांना 28 जागा मिळाल्या आहेत.

राज्यपाल कोश्यारींची सत्ता स्थापनेसाठी भाजपला विचारणा
author img

By

Published : Nov 9, 2019, 8:07 PM IST

Updated : Nov 9, 2019, 8:28 PM IST

मुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला विचारले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप हाच सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांना राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी विचारणा केली आहे. सोमवारी 11 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेविषयी निर्णय कळविणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी विचारले आहे.

यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती तेव्हा बहुमत असल्याशिवाय आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आता राज्यपालांनी सत्ता स्थापनेबद्दल विचारणा केल्यानंतर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामध्ये भाजपाला 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. तसेच मनसेला एक जागा आणि अपक्षांना 28 जागा मिळाल्या आहेत.

यापूर्वी 2014 मध्येही भाजपने अल्पमतातील सरकार स्थापन केले होते. यानंतर सभागृहातील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, यंदा शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून ताठऱ भूमिका घेतल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे भाजपने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला नव्हता. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी अस्पष्टता निर्माण झाली होती.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा दावा केला होता. मात्र, भाजपकडे अवघ्या 105 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमतासाठी लागणारा 145 चा आकडा भाजप कसा गाठणार, हा मोठा प्रश्न आहे.

Intro:Body:

[11/9, 7:45 PM] Sachin Gadhire, Mumbai: येस, काशिकरांनी नोट दिली..Maharashtra Governor asks BJP to indicate willingness to form Government

The Governor of Maharashtra Shri Bhagat Singh Koshyari today asked the leader of elected members of the single largest party, the Bharatiya Janata Party, Shri Devendra Fadnavis to indicate the willingness and ability of his party to form the government in Maharashtra.

Elections to the Maharashtra Legislative Assembly were held on 21st October and the results were declared on 24th October. However, despite the passage of 15 days, no single party or alliance of parties has come forward to form the government.

The Governor has therefore decided to explore the possibility of formation of Government and today asked the leader of the elected members of the single largest party, that is BJP, to convey its willingness and ability to form the government.

[11/9, 7:47 PM] Sachin Gadhire, Mumbai: 19 नोव्हेंबरला भाजपला बहुमत सिद्ध करावे लागणार..

Conclusion:
Last Updated : Nov 9, 2019, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.