ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागाच्या पूर्वतयारीचा राज्यपाल कोश्यारींनी घेतला आढावा - भगतसिंग कोश्यारी कोरोना बैठक

कोरोना संकटाचा मुकाबला करताना बिगर कोरोनारुग्णांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

high-level meeting
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर विविध विभागाच्या पूर्वतयारीचा राज्यपाल कोश्यारींनी घेतला आढावा
author img

By

Published : May 21, 2020, 10:11 AM IST

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यापुढील कोरोना विषाणू संसर्गाच्या आव्हानाच्या अनुषंगाने राज्याच्या विविध विभागांच्या पूर्व तयारीचा एका उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेतला. येत्या जून व जूलै महिन्यातील कोरोनाबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. कोरोना संकटाचा मुकाबला करताना बिगर कोरोनारुग्णांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. तसेच मुंबईतील कंटेनमेंट क्षेत्रासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती राज्यपालांनी घेतली.

high-level meeting
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर विविध विभागाच्या पूर्वतयारीचा राज्यपाल कोश्यारींनी घेतला आढावा

राज्यात एकूण वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्य सेवक, रुग्णालयातील उपलब्ध खाटा यांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्याची सूचना राज्यपालांनी केली. कोरोना विरुध्दच्या लढाईत आघाडीवर राहून कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस यांना प्रोत्साहन देण्याबाबत शासनाने विचार करावा, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

राज्यातून मजूरांचे स्थलांतर व स्थलांतरितांसाठी सुरू केलेल्या शिबिरांच्या सध्यस्थितीचा आढावा राज्यपालांनी घेतला. यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय. एस. चहल तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.