ETV Bharat / state

राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी - kiran pawar

राज्यपाल कोश्यारी हे एका राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांनी कोणताही भेदभाव करू नये असा प्रघात आहे. पण राज्यपालांचे वर्तन संभ्रमित करणारे आहे. राज्यपाल कोश्यारी एका विशिष्ट संघटनेचे एकेकाळी प्रतिनिधित्व करत होते, तर त्यांनाही आताच्या घडीला त्याच संघाबरोबर जोडायचे का? असा सवाल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किरण पवार यांनी केला आहे.

राज्यपाल कोश्यारी
राज्यपाल कोश्यारी
author img

By

Published : Dec 30, 2019, 7:38 PM IST

Updated : Dec 30, 2019, 9:17 PM IST

मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उघडपणे आक्षेप नोंदवल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी सोमवारी राज्यातील २६ कॅबिनेट आणि दहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र, ही शपथ घेताना अनेक मंत्र्यांनी राजशिष्टाचार विभागाने नियमित केलेल्या शपथेच्या मजकूराव्यतिरिक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महनीय व्यक्तीच्या स्मृतिला वंदन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी नियमानुसारच शपथ घेण्याचा आग्रह करत मंत्र्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज्यपालाच्या भूमिकेवर नाराजी
मंत्री के. सी. पाडवी यांना तर राज्यपाल कोश्यारी यांनी दोनदा शपथ घेण्यास सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड यांनाही राज्यपालांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावर आव्हाड म्हणाले, की आम्ही आमच्या खऱ्या दैवतांना वंदन करतो. याबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही. तर पाडवी म्हणाले की, मी आदिवासी समाजातून आलो आहे, निसर्ग ही आमची देवता आहे. यासोबतच मी मानवतेला वंदन केले, यात माझी कोणतीही चूक नाही. एकंदर राज्यपाल कोश्यारी यांनी मंत्र्यांच्या शपथेला आक्षेप घेतल्याने महाघाडीतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.राजपाल कोश्यारी यांच्यावरही आक्षेप घ्यायचा का ?राज्यपाल कोश्यारी हे एका राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांनी कोणताही भेदभाव करू नये असा प्रघात आहे. पण राज्यपालांचे वर्तन संभ्रमित करणारे आहे. राज्यपाल कोश्यारी एका विशिष्ट संघटनेचे एकेकाळी प्रतिनिधित्व करत होते, तर त्यांनाही आताच्या घडीला त्याच संघाबरोबर जोडायचे का? असा सवाल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किरण पवार यांनी केला आहे.

Intro:सूचना- या बातमीसाठी लिव्ह ३G वरून जितेंद्र आव्हाड यांचा १ TO १ पाठवला आहे . या सोबतच किरण पवार यांचा BYTE ही LIVE ३G वरून पाठवला आहे .

राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी

मुंबई ३०

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्र्यांनी घेतलेल्या शपथे बाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उघडपणे आक्षेप नोंदवल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . राज्यपाल कोश्यारी यांनी सोमवारी राज्यातील २६ कॅबिनेट आणि दहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली . मात्र ही शपथ घेताना अनेक मंत्र्यांनी राजशिष्ट्राचार विभागाने नियमित केलेल्या शपथेच्या मजकूरा व्यतिरिक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महनीय व्यक्तीच्या स्मुतील वंदन करण्याचा प्रयत्न केला . मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी नियमानुसारच शपथ घेण्याचा आग्रह करत मंत्र्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली .

मंत्री के सी पाडवी यांना तर राज्यपाल कोश्यारी यांनी दोनदा शपथ घेण्यास सांगितल्याने महाविकास आघाडीतच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे . मंत्री जितेंद्र आव्हाड , वर्षा गायकवाड यांनाही राज्यपालांनी रोखण्याचा प्रयत्न केला . यावर आव्हाड म्हणाले की आमही आमच्या खऱ्या दैवतांना वंदन करतो याबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही . तर पाडवी यांनी म्हटले की , मी आदिवासी समाजातून आलो आहे ,निसर्ग ही आमची देवता आहे यासोबतच मी मानवतेला वंदन केले , यात माझी कोणतीही चूक नाही . एकंदर राज्यपाल कोश्यारी यांनी मंत्र्यांच्या शपथेला आक्षेप घेतल्याने महाघाडीतल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे .

राजपाल कोश्यारी यांच्यावरही आक्षेप घ्यायचा का ?

राज्यपाल कोश्यारी हे एका राज्याचे राज्यपाल आहेत त्यांनी कोणताही भेदभाव करू नये असा प्रघात आहे . पण राज्यपालांचे वर्तन संभ्रमित करणारे आहे . राज्यपाल कोश्यारी एका विशिष्ट संघटनेचे एकेकाळी प्रतिनिधित्व करत होते , तर त्यांना ही आताच्या घडीला त्याच संघाबरोबर जोडायचे का असा सवाल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किरण पवार यांनी केला आहे . Body:....Conclusion:
Last Updated : Dec 30, 2019, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.