ETV Bharat / state

Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादात?; चपला घालून हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली - Governor Bhagat Singh Koshyari

Governor Bhagat Singh Koshyari: आज मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या हल्ल्यातील शहिदांना विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Governor
Governor
author img

By

Published : Nov 26, 2022, 1:59 PM IST

मुंबई: Governor Bhagat Singh Koshyari: वारंवार महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अपमान करून विवादामध्ये राहिलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari हे आता पुन्हा एका नव्या विवादात सापडले आहेत. आज २६/११ दहशतवादी हल्ल्या निमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित करत असताना पायात चपला घालून त्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली दिली आहे. यावरून आता पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले आहे.

राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादात?; चपला घालून हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

नेमके काय झाले ? २६/११ या दहशतवादी हल्ल्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी श्रद्धांजलीपर कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमांमध्ये हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari हे पायात चपला घालून श्रद्धांजली देताना दिसून आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde , उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा उपस्थित होते. या सर्वांनी चपला काढून हुतात्म्याना श्रद्धांजली वाहिली. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चपला घालून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावरून आता पुन्हा एकदा राज्यपाल विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.

सचिन सावंतांचे खोचक ट्विट: काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज्यपालांच्या या कृतीवरून ट्विट करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनाही सुनावले आहे. सचिन सावंत म्हणाले आहेत की, अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती, तर बरे झाले असते, असं खोचक ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.