ETV Bharat / state

सर्व जिल्ह्यात जोमाने काम करा; रेड क्रॉसला राज्यपालांचे निर्देश

author img

By

Published : Apr 28, 2021, 8:05 PM IST

मास्क वाटप, करोनाविषयक जनजागृती, लसीकरण आदी कार्यात रेड क्रॉस संस्थेने सहभागी होण्याची सूचना राज्यपालांनी केल्या.

Governor Bhagat Singh Koshyari
Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई - करोनाच्या संकटात राज्यातील सर्व जिल्ह्यांत रेड क्रॉस संस्थेने जोमाने काम करावे, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले. भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी राज्यपालांनी दूरस्थ माध्यमातून चर्चा केली.

अधिक सक्रियतेने काम करण्याची सूचना
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रेड क्रॉस संस्थेने अधिक सक्रियतेने काम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. मास्क वाटप, करोनाविषयक जनजागृती, लसीकरण आदी कार्यात रेड क्रॉस संस्थेने सहभागी होण्याची सूचना त्यांनी केल्या. भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे महासचिव तेहमुरस्प सकलोथ यांनी संस्थेतर्फे करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती राज्यपालांना दिली. संस्थेचे उपाध्यक्ष होमी खुस्रोखान हे देखील यावेळी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.