ETV Bharat / state

"सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवून देणे, आमच्या सरकारची वचनबद्धता" - Inauguration of CIDCO houses

मुंबईमध्ये स्वतः च्या हक्काचे घर असावे, असे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न असते. आता ते प्रत्यक्षात साकारायला सुरुवात झाली आहे. यापुढील काळातही आमच्या सरकारची ही वचनबद्धता असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Cm uddhav thackeray
"सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवून देणे आमच्या सरकारची वचनबद्धता"
author img

By

Published : Jul 28, 2020, 8:04 AM IST

Updated : Jul 28, 2020, 8:41 AM IST

मुंबई : मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचे घर असावे, असे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न असते. आता ते प्रत्यक्षात साकारायला सुरुवात झाली आहे. यापुढील काळातही आमच्या सरकारची ही वचनबद्धता असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सोमवारी त्यांच्या हस्ते पोलिसांसाठी असलेल्या ४ हजार ४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ३ हजार ६७० यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप, तसेच निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगारमंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी उपस्थित होते. यावेळी सिडकोतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १ कोटीची मदत करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सिडकोतर्फे या माध्यमातून योगदान करण्यात आले आहे.

आज माझ्या वाढदिवसाचे निमित्त ठरवून सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न वास्तवात आणणारा कार्यक्रम करीत आहेत ही माझ्यासाठी अनोखी भेट आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पूर्वी इंग्रजांनी थंड हवेची ठिकाणे विकसित केली, त्याठिकाणी राहण्याच्या सोयी केल्या. शहरालगत इतक्या जवळ आणि विमानतळापासून हाकेच्या अंतरावरील खारघर हेवन हिल्स हे देखील एकप्रकारे वैशिष्ट्यपूर्ण हिल्स स्टेशन राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सिडकोच्या या उपक्रमांचे कौतुक केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांसाठी अशा प्रकारे पहिल्यांदाच सिडकोच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे सांगितले तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आणखीही घरे पुढील टप्प्यात सिडकोने उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

घर वाटप पत्र ईमेलद्वारे -

सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांना यावेळी इलेकट्रॉनिक पद्धतीने घरांचे वाटपपत्र थेट त्यांच्या मेलमध्ये देण्यात आले. यात सिडको महागृहनिर्माण योजना १ व २, स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना, वास्तुविहार व सेलिब्रेशन गृहनिर्माण योजना आणि एनआरआय कॉम्प्लेक्स या योजनांतील वाटपपत्रांचा समावेश होता.

ऑनलाईन सोडतीत विजयी झालेल्या अर्जदारांच्या कागदपत्र पडताळणीकरिताची प्रक्रिया सोपी, जलद व अचूक पद्धतीने व्हावी याकरिता सिडकोद्वारे निवाराकेंद्राची उभारणी केली आहे. करोनाच्या अनुषंगाने संगणक प्रणालीमध्ये बदल करून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. याद्वारे अर्जदार घरबसल्या आपिलाकरिता कागदपत्रे सिडको निवारा केंद्राच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन जमा करू शकतील. जे अर्जदार कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरतील त्यांचेकरीत अपिलाची प्रक्रिया देखील ऑनलाईन पद्धतीने विकसित केली असून, कागदपत्रे जमा करण्यासाठी अर्जदाराने आपल्या खात्यात लॉगइन करून अपील करावे. त्यानंतर अपिलाची माहिती व कागदपत्रे अपलोड करून ती जमा (सबमिट) करणे शक्य आहे.

सिडकोचे अधिकारी संगणक प्रणालीत उपलब्ध असलेल्या व्हिडिओ कॉल सुविधेचा वापर करून अर्जदाराशी संवाद साधू शकतात. त्याकरिता अर्जदारांना व्हिडिओ कॉल करिताचा दिनांक व वेळ निवडता येतो. त्या माध्यमातून अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यानंतर अर्जदारांच्या अपिलाबाबतचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेतला जातो. वेगवान आणि ऑनलाईन जगात, कागदपत्रांची पडताळणी आणि प्रक्रिया ही सुद्धा वेगवान, ऑनलाईन आणि अचूक असायलाच हवी यासाठी या व्हर्च्युअल निवारा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

पोलिस कर्मचारी :गृहनिर्माण योजना

'पोलिस कर्मचारी’ यांच्याकरिता सिडकोतर्फे गृहनिर्माण योजनाची ऑनलाईन अर्जनोंदणी करण्यासही सुरुवात झाली. तब्बल ४ हजार ४६६ पोलीस कुटुंबाना हक्काचा निवारा मिळणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील पोलीस कर्मचाऱ्यासाठी सदर योजना उपलब्ध आहे. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली व द्रोणागिरी या ५ नोड्समध्ये आकारास येणारी गृहनिर्माण योजनाकेवळ मुंबई महानगर कार्यक्षेत्रात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी, शुल्क भरणा, आणि सोडतीची पारदर्शक व सुलभ प्रक्रीया वापरून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेल्या सदनिका असतील.

खारघर हेवन हिल्स

खारघर टेकड्यांच्या शांत, सुंदर आणि निसर्गसंपदेने नटलेल्या या नयनरम्य परिसरात सिडकोतर्फे खारघर हेवन हिल्स प्रकल्प साकारण्यात येत आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या या खारघर टेकड्यांवर साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात निवासी व्हिला, रिसॉर्ट, नेचरोपॅथी सेंटर यांचा मुख्यत्वे समावेश आहे. सिडकोतर्फे खारघर हिलच्या माथ्यावरील २५० एकरवर ‘खारघर हेवन हिल्स' हा प्रकल्प प्रस्तावित आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मिनी हिलस्टेशन परिसरात एक उच्चभ्रू वसाहत विकसित करण्यात येणार आहे. याचबरोबर येथील विस्तीर्ण परिसरावर नेचरोपॅथी सेंटर उभारले जाणार आहे. याखेरीज शहरातील गजबजाटापासून शांततेचे व मनोरंजनाचे दोन क्षण आपल्या कुटुंबियांसमवेत व्यतित करता यावेत यासाठी या निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टदेखील विकसित केले जाणार आहे. याचबरोबर सुमारे 250 एकर्सपैकी 39% एवढी मोकळी जागा सोडण्यात आली आहे. यातून पर्यावरणाचा पूर्ण समतोल राखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

खारघर हेवन हिल प्रकल्प नवी मुंबई आंतरारष्ट्रीय विमानातळापासून 20 मिनीटांच्या अंतरावर आहे. यामुळे देशी व परदेशी अशा दोन्ही प्रकारच्या पर्यटकांसाठी हा हेवन हिल प्रकल्प आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. याचबरोबर हा प्रकल्प खारघर रेल्वे स्थानकापासून 3.08 कि.मी. अंतरावर आहे. मुख्य शहरांना जोडणारे रस्त्यांचे जाळेदेखील विकसित करण्यात आले आहे. सर्वच प्रकारे उत्तम कनेक्टिविटी असलेला हा प्रकल्प म्हणजे निसर्ग आणि शहरीकरण यांचा सुवर्ण संगम आहे.त्याचबरोबर 350 एकरच्या विस्तीर्ण परिसरात सिडकोतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉर्पोरेट पार्क विकसित करण्यात येत आहे. या कॉर्पोरेट पार्कमध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम व फुटबॉलसाठी विशेष प्राविण्य केंद्र उभारण्याचा सिडकोचा मानस आहे.

Last Updated : Jul 28, 2020, 8:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.