ETV Bharat / state

Pregnant Women Maternity : कष्टकरी गर्भवती महिलांना रोज मिळणार २४० दिवसांसाठी ३०० रुपयांचा भत्ता - Employing women during pregnancy

राज्यातील अनेक दुष्काळी भागांत महिलांना गर्भावस्था आणि नंतरही लगेचच कामाला जुंपले ( Employing women during pregnancy ) जाते. महिलांना अनेकदा गर्भावस्थेत शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टा सहन कराव्या ( Physical and mental distress during pregnancy ) लागतात. सरकारने आता अशा महिलांचे मातृत्व स्वीकारले असून गर्भावस्था काळात विशेष आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Pregnant Women Maternity
गर्भवती महिला
author img

By

Published : Oct 20, 2022, 1:37 PM IST

मुंबई - राज्यातील अनेक दुष्काळी भागांत महिलांना गर्भावस्था आणि नंतरही लगेचच कामाला जुंपले ( Employing women during pregnancy ) जाते. महिलांना अनेकदा गर्भावस्थेत शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टा सहन कराव्या ( Physical and mental distress during pregnancy ) लागतात. सरकारने आता अशा महिलांचे मातृत्व स्वीकारले असून गर्भावस्था काळात विशेष आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे.

महिलेसाठी गर्भावस्थेचा काळ विशेष : प्रत्येक महिलेसाठी गर्भावस्थेचा काळ महत्त्वाचा ( Pregnancy period important ) असतो. या काळात गर्भावस्थेत महिलांमध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात. त्यामुळे गरोदर राहिल्यानंतर महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. नियमित आहार, शारीरिक हालचाली, ताणतणाव हॉर्मोनल बदल या बाबींचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे त्यांनी गरोदरपणात आरोग्याची काळजी घेणे अपेक्षित असते. शहरी भागात महिलांना आरोग्याचे धडे दिले जातात. विशेष काळजी घेतली जाते. खेडोपाड्यात ही परिस्थिती उलट ( Physical mental changes in women during pregnancy) आहे.

आदिवासी आणि शहरी भागातील महिलांना फायदा : राज्यातील खेडोपाड्यात वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे, नापीक शेतीवर अवलंबून न राहता चुलीतील आग पेटवण्यासाठी आणि पोटातील आग भागवण्यासाठी शिवाय, आर्थिक परिस्थिती अभावी गर्भवती महिला आणि मातांना तात्काळ कामाला जुंपले जाते. दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात हे प्रमाण अधिक आहे. परिणामी गर्भवती महिलांची शारीरिक, मानसिक जीवनशैली आरोग्यासाठी उत्तम राहत नाही. अपवाद वगळता काही गर्भवती महिला आणि नवमातांना अतिश्रम केल्याने जीवही गमवावा लागला आहे. राज्य सरकारने अशा महिलांसाठी मातृत्व स्वीकारणारे अभिनव उपक्रम हाती घेणार आहे. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या संदर्भातील आढावा घेतला असून नवा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागातील महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे.

प्रति महिला ७२ हजार रुपये मिळणार : आर्थिक परिस्थिती अभावी गर्भवती महिला आणि माता यांचा काही भागांत सासू, सासरे, नवऱ्याकडून काम करत नसल्याने जाच जातो. राज्याच्या आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी गर्भवती महिला आणि मातासांठी २४० दिवसांकरीता ३०० रुपये प्रमाणे मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सुमारे १२ लाख महिला गर्भवती महिला आणि माता आहेत. या महिलांना ही मदत देण्याचे प्रस्तावित आहे. सुमारे ७२ हजार रुपये एका महिलेला रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम थेट महिलांच्या खात्यात जमा होईल. संबंधित महिलेव्यतिरिक्त कोणाला ही पैसे काढता येणार नाहीत. घरच्या जाचातून महिलांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे. मात्र, दोन अपत्य असतील तरच या योजनेचा लाभ घेता येईल.

महिलांची जाचातून मुक्तता होईल : खेडोपाड्यात गर्भवती महिला आणि मातांची परिस्थिती भयंकर वाईट असते. सासू सासऱ्यांचा जाच होतो. दारूसाठी पैसे न दिल्यास नवऱ्याकडून मारहाण होते. अशा महिलांना आरामदायी जीवनशैली जगता यावी, यासाठी सरकारकडून एक दिलासा देण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. सुमारे २४० दिवसांसाठी ३०० रुपये प्रमाणे मोबदला देण्याचा विचार आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवर याचा कोणताही भार येणार नाही, असे नियोजन केल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडणार असल्याचे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.