मुंबई - सरकारने महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी आधुनिक शाळा आणि विद्यापीठे उभारणे आवश्यक आहे. यामुळे मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना आदर्श नागरिक करण्यासाठी मदत मिळेल. चांगले शिक्षण मिळाले तरच स्पर्धात्मक जगात ते टिकाव धरु शकतील, असे मत रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. राजन हे त्यांच्या परखड मतांसाठी प्रसिद्ध आहे. याबाबत युवापिढीला काय वाटत? राजन यांचे मत तरूणाईला मान्य आहे का? ई टीव्ही भारतने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - मध्य रेल्वेवरील पहिली एसी लोकल चालवण्याचा मान महिला मोटरमनला; लवकरच येणार रुळावर
भारताची अर्थव्यवस्था कोडमली आहे. मुलांना कमी खर्चात शिक्षण मिळाले पाहिजे. रघुराम राजन यांनी मांडलेले मत अतिशय योग्य आहे. पुतळे उभारण्यापेक्षा महापुरुषांच्या नावाने आधुनिक शाळा उभारल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याऐवजी त्यांचे वैभव असलेले गडकिल्ले जपले गेले पाहिजेत, असे मत तरुणाईनी व्यक्त केले.