मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. सरकारने खबरदारी म्हणून चित्रपट गृह, मॉल, जलतरण तलाव काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा फटका विविध उद्योगांना बसणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजना करताना बेरोजागारी वाढणार नाही, यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
कोरेनामुळे जगातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन अनेक व्यवसाय ठप्प झाले आहे. भारतातही हीच परिस्थिती आहे. अनेक व्यवसाय आणि उद्योगांना याचा फटका बसला आहे. कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला आहे, याचे विश्लेषण झाले पाहिजे. त्यानंतर त्यावर उपाय योजना करता येतील. यासाठी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
हेही वाचा - COVID-19 LIVE : राज्यात आढळला नवा रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ वर..
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी असल्याने अप्रत्यक्ष फायदा भाजप सरकारला मिळत आहे. तेलाचे दर कमी झाले असताना देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करता आले असते. यामुळे वाहतुकीची खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणारा निर्णय घेता आला असता. मात्र, केंद्र सरकारने असा निर्णय घेतला नाही, हे दुर्दैव असल्याचे कोल्हे म्हणाले.