मुंबई: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना तातडीची मदत जाहीर केली. मात्र, अद्याप ती मदत न मिळाल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपसमितीची बोलावली आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या विविध समित्या नेमण्याबाबत गटनेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. ठाकरे गटाला या बैठकीला निमंत्रित केले जाणार का ? पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य सरकारच्या जोर बैठका होणार आहेत.
आरोप विरोधी पक्षांनी केला: त्यामुळे मंत्रिमंडळ बरोबरच या बैठकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडवली. भात पिकांचे नुकसान झाले. सरकारने मदतीची घोषणा केली. अनेकांना अद्याप मदतीचा लाभ मिळालेला नाही. काही भागात पंचनामेच झाले, नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. राज्य सरकारवर यावरून जोरदार टीकास्त्र सोडले. सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप देखील केला.
उपसमितीची बैठक बोलावली: दुसरीकडे शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य लोकांचे सरकार घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने मोठी नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उपसमितीची बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही बैठक होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, कृषी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांना आता तरी दिलासा मिळेल, असा प्रश्न विचारला जातो आहे.
विधिमंडळाच्या समित्या ठरवणार: डिसेंबर महिन्यात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या विविध समित्या ठरवण्याबाबत मंत्रालयात सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशनाचा कालावधी, विविध विषय ठरवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर विधिमंडळात दोन गट झाले आहेत. विधानसभेत ठाकरे गटाच्या गटनेते पदी अजय चौधरी यांचे पत्र दिले आहे. तर शिंदे गटाकडून भरत गोगावले हे गटनेते आहेत. ठाकरे गटाला या बैठकीला बोलावले जाणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.