ETV Bharat / state

'धनगर समाजाची फसवणूक केली, आता आम्ही सरकारचे पानिपत करू'

शेंडगे म्हणाले, की आमची प्रमुख मागणी ही आरक्षण देण्याची होती आणि त्याची अंमलबजावणी करण्याची होती. म्हणूनच त्यांनी आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही पहिल्याच बैठकीत निर्णय घेतो, असे आश्वासन दिले होते. परंतु सरकारने दिलेला शब्द फिरवला. आम्हाला घटनात्मक आरक्षण देणे हे आवश्यक होते. परंतु, त्यांनी हा शब्द फिरवून आमची फसवणूक केलेली आहे.

माजी आमदार व धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे
author img

By

Published : Mar 2, 2019, 10:19 PM IST

मुंबई - सत्तेवर येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने राज्यातील धनगर समाजाची घोर फसवणूक केली असल्याचा आरोप माजी आमदार व धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज केला. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर समाजाला अनेक सवलतींची घोषणा करण्यात आली. त्यावर शेंडगे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शेंडगे म्हणाले, की आमची प्रमुख मागणी ही आरक्षण देण्याची होती आणि त्याची अंमलबजावणी करण्याची होती. म्हणूनच त्यांनी आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही पहिल्याच बैठकीत निर्णय घेतो, असे आश्वासन दिले होते. परंतु सरकारने दिलेला शब्द फिरवला. आम्हाला घटनात्मक आरक्षण देणे हे आवश्यक होते. परंतु, त्यांनी हा शब्द फिरवून आमची फसवणूक केलेली आहे. आम्ही आरक्षण मागत होतो, मात्र त्यांनी आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली. आम्ही सर्टिफिकिट मागत होतो, त्यांनी आम्हाला अॅफिडेव्हिट दिले. या सरकारला आमचे संपूर्ण आंदोलन न्यायालयात अडकवायचे आहे. आम्हाला न्यायालयात खेटे मारायला लावायचे आहे. परंतु आमची सेना-भाजपने घोर निराशा केली आहे.

आता धनगर समाज सरकारच्या या गाजर दाखवण्याला बळी पडणार नाही. हे लबाडाघरचे आमंत्रण आहे. आम्हाला जर सवलतीच द्यायच्या होत्या, तर ४ वर्षांपूर्वी का दिल्या नाहीत? आता आम्हाला निवडणुकीच्या तोंडावर ते गाजर दाखवत आहेत. त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर आम्ही या सरकारला सळो की, पळो करून सोडू. तसेच सरकारचे पानिपत करून सोडू, असा इशारा शेंडगे यांनी दिला. दरम्यान, भटक्या विमुक्त संघटनेचे धनंजय बेडदे यांनीही यावेळी सरकारला आता निवडणुकीच्या रिंगणात धडा शिकवू, असा इशारा दिला. यावेळी शेंडगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी यळकोट येळकोट जय मल्हारच्या जोरदार घोषणा देत मंत्रालय परिसर दणाणून सोडला.

undefined

Intro:धनगर समाजाची फसवणूक केली, आता आम्ही सरकारचे पानिपत करू- प्रकाश शेंडगेBody:धनगर समाजाची फसवणूक केली, आता आम्ही सरकारचे पानिपत करू- प्रकाश शेंडगे
(यासाठी प्रकाश शेंडगे यांचा बाईट आणि व्हीज्वल मोजोवर पाठवला आहे)
मुंबई, ता. २ :
सत्तेवर येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणा-या सरकारने राज्यातील धनगर समाजाची घोर फसवणूक केली असल्याचा आरोप माजी आमदार व धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज केला. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर समाजाला अनेक सवलतींची घोषणा करण्यात आली त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आमची प्रमुख मागणी ही आरक्षण देण्याची होती आणि त्याची अंमलबजावणी करण्याची होती. म्हणूनच त्यांनी आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही पहिल्याच बैठकीत निर्णय घेतो असे आश्वासन दिले होते. परंतु सरकारने दिलेला शब्द फिरवला. आम्हाला घटनात्मक आरक्षण देणे हे आवश्यक होते, परंतु त्यांनी हा शब्द फिरवून आमची फसवणूक केलेली आहे. आम्ही आरक्षण मागत होतो आणि त्यांनी मात्र आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली. आम्ही सर्टिफिकीट मागत होतो, त्यांनी आम्हाला ॲफेडाव्हीट दिले. या सरकारला आमचे संपूर्ण आंदोलन नेवून कोर्टात अडकावायचे आहे. आम्हाला कोर्टात खेटे मारायला लावायचे आहे. परंतु आमची सेना-भाजपाने घोर निराशा केलेली आहे. धनगर समाजाला प्रत्येक घटक हा सरकारच्या या गाजर दाखविण्याला बळी पडणार नाही. हे लबाडाघरचे आमंत्रण आहे. आम्हाला जर सवलतीच द्यायच्या होत्या तर चार वर्षांपूर्वी का दिल्या नाहीत, आता आम्हाला निवडणुकीच्या समोर आम्हाला ते गाजर दाखवत आहेत, त्यामुळे आम्हाला जर आरक्षण मिळाले नाही तर आम्ही या सरकारला आम्ही सळो की, पळो करून सोडून आणि सरकारचे पानिपत करून सोडू असा इशाराही दिला.
दरम्यान, भटक्या विमुक्त संघटनेचे धनंजय बेडदे यांनीही यावेळी सरकारला आता निवडणुकीच्या रिंगणात आम्ही धडा शिकवू असा इशारा दिला. यावेळी शेंडगे यांच्यासह कार्यकर्त्यांची यळकोट येळकोट जय मल्हारच्या जोरदार घोषणाबाजी करत मंत्रालय परिसर दणाणून सोडले.Conclusion:धनगर समाजाची फसवणूक केली, आता आम्ही सरकारचे पानिपत करू- प्रकाश शेंडगे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.