ETV Bharat / state

मुंबईत पालिका, राज्य शासनाची रुग्णालये व्हेंटिलेटरवर

author img

By

Published : Sep 24, 2019, 6:15 PM IST

मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता मुंबई महानगरपालिका व राज्य शासनाकडून शहरात  रुग्णालये सुरू आहेत. मात्र, ही रुग्णालये स्वतःच व्हेंटिलेटरवर असल्याची बाब समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ता चेतन कोठारी

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची लोकसंख्या दोन कोटींच्या जवळ जाऊन पोहचली आहे. मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता मुंबई महानगरपालिका व राज्य शासनाकडून शहरात रुग्णालये सुरू आहेत. मात्र, ही रुग्णालये स्वतःच व्हेंटिलेटरवर असल्याची बाब समोर आली आहे. माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ता चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारातून ही माहिती मिळवली.

मुंबई महानगरपालिका व राज्य शासनाची रुग्णालये स्वतःच व्हेंटिलेटरवर

मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयामध्ये एकूण १२ व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी ४ व्हेंटिलेटर सध्या कार्यान्वित नाहीत. कामा हॉस्पिटलमध्ये सुद्धा असेच चित्र आहे. या ठिकाणचे एक व्हेंटिलेटर, तर वांद्रे येथील नागरी सेवा केंद्रातील २ व्हेंटिलेटर निष्क्रिय आहेत. ही बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.

हेही वाचा - पीएमसी बँकेच्या संदर्भात आरबीआय व अर्थ मंत्रालयाशी संपर्क सुरू आहे - किरीट सोमय्या

नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या बाबतीत रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, रुग्णालयात येणारी रुग्णांची संख्या व त्यावर उपलब्ध असलेली उपचार यंत्रणा यांचा ताळमेळ सध्या बसत नसल्याचे समोर येत आहे.

Intro:देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची लोकसंख्या ही दोन कोटींच्या जवळ जाऊन पोचलेली आहे मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता मुंबई महानगरपालिका व राज्य शासनाकडून मुंबई शहरात विविध रुग्णालय सध्या सुरू आहेत मात्र ही रुग्णालय स्वतः व्हेंटिलेटरवर असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
Body:राज्य सरकारच्या मुंबईतील गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल मध्ये एकूण बारा व्हॅनटिलेटर आहेत मात्र त्यापैकी चार वेंटिलेटर सध्या कार्यान्वित नाहीत. कामा हॉस्पिटलमध्ये सुद्धा असंच चित्र असून याठिकाणी एक वेंटिलेटर तर बांद्रा येथील नागरी सेवा केंद्रातील दोन व्हेंटिलेटर निष्क्रिय असल्याचे माहिती अधिकारातून समोर आलेल आहे. आयटीआय कार्यकर्ता चेतन कोठारी यांच्यानुसार माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून समोर येतंय कि कामा हॉस्पिटलमधील दोन एनआयसीयु विभागातील दोन व्हेंटिलेटर पैकी एक व्हेंटिलेटर सध्या काम करतेय. तर दुसरा नादुरुस्त होऊन बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील बांद्रा परिसरातील नागरी सेवा केंद्रातील दोन वेंटिलेटर हे नादुरुस्त असल्याचं समोर आलंय. Conclusion:मुंबई महानगर पालिका व राज्य सरकारच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या रुग्णालयातील नादुरुस्त वेन्टिलेटर च्या बाबतीत रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत . मात्र रुग्णालयात येणारी रुग्णांची संख्या व त्यावर उपलब्ध असलेली उपचार यंत्रणा यांचा ताळमेळ सध्या बसत नसल्याचे समोर येत आहे.

(बाईट - चेतन कोठारी , आरटीआय कार्यकर्ता )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.