मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विधानभवनच्या कँटिनमध्ये मटकीच्या उसळमध्ये चिकनचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे गटनेते विजय वेडट्टीवार यांनी टिका करत कँटींग चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कँटिनमध्ये आधिकारी, नेते, पत्रकार हे नियमितपणे जेवण करत असतात. सरकारने या कँटींन चालकावर कारवाई करण्याची मागणी विजय वेडट्टीवार यांनी केली. मंत्रालय कर्मचारी मनोज लाखे यांनीही विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे तक्रार केली आहे.