ETV Bharat / state

शिक्षकांच्या 'आश्वासित प्रगती' योजनेसाठी सरकारने नेमली समिती - Shiva Nath Darade

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सरकारने १० वर्षे, २० वर्षे आणि ३० वर्षांची 'आश्वासित प्रगती' योजना ही मार्चच्या सुरुवातीला लागू केली आहे. मात्र, त्यात शिक्षकांना डावलण्यात आले होते. याविषयी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पाठपुरावा करत ही योजना शिक्षकांनाही लागू करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने याविषयावर समिती नेमली आहे.

शिवनाथ दराडे, शिक्षक परिषदेचे कार्यवाहक
author img

By

Published : Aug 1, 2019, 10:16 AM IST

मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेली आश्वासित प्रगती योजना लवकरच राज्यातील शिक्षकांनादेखील लागू होणार आहे. याबाबत बुधवारी राज्य सरकारने समिती गठीत केली असून राज्यातील शिक्षक संघटनांनी त्याचे स्वागत केले आहे. या योजनेचा लाभ सुमारे चार लाखांहून अधिक शिक्षकांना‍ होणार आहे.

याबाबत माहिती देताना शिक्षक परिषदेचे कार्यवाहक, शिवनाथ दराडे

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सरकारने १० वर्षे, २० वर्षे आणि ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना ही मार्चच्या सुरुवातीला लागू केली आहे. मात्र, त्यात शिक्षकांना डावलण्यात आले होते. याविषयी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पाठपुरावा करत ही योजना शिक्षकांनाही लागू करावी अशी मागणी केली होती. यासाठी शिक्षक आमदार नागो गाणार, शिक्षक परिषदेचे कार्यवाहक शिवनाथ दराडे, निरंजन गिरी, भारत काकड आदींनी याविषयी अनेकदा सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी २४ जुलै रोजी एक जीआर काढून या मुद्यावर एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारने ही समिती स्थापन केली आहे.

ही समिती एकूण सात जणांची आहे. यात शिक्षण आयुक्त हे अध्यक्ष असणार असून इतर सहा सदस्य आहेत. ही समिती शिक्षकांना लागू करण्यात येणाऱ्या आश्वासित प्रगती योजनेसाठी आपला अहवाल येत्या तीन महिन्याच्या आत सरकारला सादर करणार आहे. या समितीत अशासकीय व शासकीय सदस्य घेण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे समितीत शिक्षकांचेही प्रतिनिधी घेण्यात यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे.

काय आहे आश्वासित प्रगती योजना ?

राज्यातील अनुदानित शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांना पूर्वी १२ वर्षांनी वरिष्ठ श्रेणी आणि त्यातील २० टक्के शिक्षकांना विशिष्ठ अटींवर निवडश्रेणी मिळत हेाती. या योजनेमुळे आता १०, २० व ३० वर्षांनी तीन टप्प्यात वेतन टप्पे बदलले जाणार आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक शिक्षकांना वेतनाचा अधिकचा आश्वासित लाभ मिळणार आहे. शिक्षकांना त्यांच्या सेवाकाळात कोणतीही बढती मिळत नसल्याने ही योजना त्यांच्यासाठी लाभाची ठरणारी आहे.

Intro:शिक्षकांच्या आश्वासित प्रगती योजनेसाठी सरकारने समिती नेमलीBody:शिक्षकांच्या आश्वासित प्रगती योजनेसाठी सरकारने समिती नेमली
राज्यातील सुमारे चार लाखांहून अधिक शिक्षकांना मिळणार लाभ
slug : mh-mum-schoolteacher-yojana-shivnathdarade-byte-7201153
मुंबई, ता. ३१ :
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेली आश्वासित प्रगती योजना लवकर राज्यातील शिक्षकांना लागू होणार आहे. यासाठी राज्य सरकारने आज समिती गठीत केली असून त्याचे स्वागत राज्यातील शिक्षक संघटनांनी केले आहे. या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ सुमारे चार लाखांहून अधिक शिक्षकांना‍ मिळणार आहे.
राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सरकारने १० वर्षे, २० वर्षे आणि ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना ही मार्चच्या सुरूवातीला लागू केली आहे. मात्र त्यात शिक्षकांना डावलण्यात आल्याने त्याविषयी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पाठपुरावा करत ही योजना शिक्षकांनाही लागू करावी अशी मागणी केली होती. शिक्षक आमदार नागो गाणार, शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे,निरंजन गिरी,भारत काकड आदींनी याविषयी अनेकदा सरकारकडे पत्रव्यवहार केला हेात त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी याची दखल घेत २४ जुलै रोजी यासाठीचा एक जीआर काढून एक समिती गठित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज सरकारने ही समिती गठीत केली आहे. ही समिती सात जणांची असून शिक्षण आयुक्त हे अध्यक्ष असणार असून इतर सहा सदस्य आहेत. ही समिती शिक्षकांना लागू करण्यात येणाऱ्या आश्वासित प्रगती योजनेसाठी आपला अहवाल येत्या तीन महिन्याच्या आत सरकारला सादर करणार आहे. या समितीत अशासकीय व शासकीय सदस्य घेण्याचीही तरतूद करण्यात आली असल्याने या समितीत शिक्षकांचेही प्रतिनिधी घेण्यात यावेत अशी मागणी शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे.
--
काय आहे आश्वासित प्रगती योजना ?
राज्यातील अनुदानित शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांना पूर्वी १२ वर्षांनी वरिष्ठ श्रेणी आणि त्यातील २० टक्के शिक्षकांना विशिष्ठ अटींवर निवडश्रेणी मिळत हेाती. या योजनेमुळे आता १०, २० व ३० वर्षांनी तीन टप्प्यात वेतन टप्पे बदलले जाणार आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक शिक्षकांना वेतनाचा अधिकचा आश्वासित लाभ मिळणार आहे. शिक्षकांना त्यांच्या सेवाकाळात कोणतेही बढती मिळत नसल्याने ही योजना त्यांच्यासाठी लाभाची ठरणारी आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.