ETV Bharat / state

Police Arrested Tik Tok Star : 'त्या' टिक टॉक स्टारला अटक ; राजस्थानचा शाही खानदानी सांगून महिलांची फसवणूक, गोरेगाव पोलीसांची कारवाई - Goregaon Police

सोशल माध्यमातून महिलांचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलांकडून पैसे उकळणाऱ्या एका तरुणाला गोरेगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली (Goregaon Police arrested Tik Tok star) आहे. हा तरुण महिलांना स्वतःची ओळख राजस्थानी शाही कुटुंबातील वारस अशी करून देत (claiming to beroyal family of Rajasthan) असे.

Police Arrested Tik Tok Star
टिक टॉक स्टारला अटक
author img

By

Published : Nov 26, 2022, 1:22 PM IST

मुंबई : सोशल माध्यमातून महिलांचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलांकडून पैसे उकळणाऱ्या एका तरुणाला गोरेगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली (Goregaon Police arrested Tik Tok star) आहे. गोरेगाव पोलीसांनी या आरोपीला आरे कॉलनीतून अटक केली. हा तरुण महिलांना स्वतःची ओळख राजस्थानी शाही कुटुंबातील वारस अशी करून देत (claiming to beroyal family of Rajasthan) असे.

प्रतिक्रिया देताना दत्तात्रय थोपटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरेगांव

फोटोंचा वापर वसुलीसाठी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पोखराज देवासी उर्फ राजवीर सिंग याची गुन्हे करण्याची एक वेगळीच पद्धत होती. तो इंस्टाग्राम सोशल मध्यामत राजस्थानच्या महालातील स्वतःचे फोटो अपलोड करत असे. यानंतर तो महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असे, त्यातील अनेक महिला त्याला राजस्थानचा शाही वारस म्हणून त्याच्या मैत्रीची ऑफर स्वीकारत असत. यावर अनेक महिलांशी दोस्ती करून प्रेमाची बतावणी करून त्यांचे खाजगी फोटो मागत असे, याच फोटोंचा वापर तो वसुली करण्यासाठी वापर करत (Police Arrested Tik Tok Star) असे.

फोटो वायरल करण्याची धमकी : गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणारी 30 वर्षीय तक्रारदार महिला या टिक टॉक स्टारच्या जाळ्यात फसली होती. आरोपीने तिच्याकडे देखील पैशाची मागणी केली. सुरुवातीला पिढी देणे त्याला चार लाख रुपये दिले. मात्र तो वारंवार पैसे मागू लागल्यानंतर पैसे न दिल्याने तो तिला फोटो सोशल माध्यमातून वायरल करण्याची धमकी देऊ लागला होता. यालाच कंटाळून महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली (Tik Tok star cheated women) होती.

गुन्हा दाखल : आरोपी विरोधात तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी भादवि आणि आयटी अधिनियमचे विविध कलम लावून आरोपीला गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतून ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यामध्ये देखील मागील वर्षी आरोपी देवासी विरोधात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल होऊन त्यात देखील त्याला अटक झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आला होता.

ब्लॅकमेल करून पैसे वसूल : आरोपी हा राजस्थानचा राहणारा असून त्याचे इंस्टाग्राम अकाउंट, झगमगते महल, लक्झरी गाडी आणि अवतीभवती सुरक्षा गार्ड असल्याच्या फोटोंनी भरलेला आहे. आरोपीने आतापर्यंत 50 हून अधिक महिलांना ब्लॅकमेल करून पैसे वसूल केले आहेत. आरोपीला न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली (Goregaon Police) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.