ETV Bharat / state

Good Friday 2023: असा आहे गुड फ्रायडेचा इतिहास, ख्रिश्चन धर्मात महत्वाचा दिवस... - चर्चमध्ये विशेष प्रार्थना

आज गुड फ्रायडे आहे. ख्रिश्चन धर्माचे लोक प्रभु येशूच्या स्मरणार्थ हा सण साजरा करतात. हा शोक आणि बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी, गुड फ्रायडे, ख्रिश्चन समुदायाचा मुख्य सण, इस्टर संडेच्या आधी शुक्रवारी येतो. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा घेतल्या जातात.

EtGood Friday 2023
गुड फ्रायडे 2023
author img

By

Published : Apr 7, 2023, 8:06 AM IST

गुड फ्रायडे आणि इतिहासाचे महत्त्व जाणून घ्या

मुंबई : सध्या सणावाराचे दिवस आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, रामनवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा या सोबतच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान देखील सुरू आहे. यापाठोपाठ आता ख्रिश्चन बांधवांसाठी पवित्र दिवस असलेला गुड फ्रायडे देखील याच आठवड्यात आहे. हा गुड फ्रायडे दिवस म्हणजे नेमका काय? तो का साजरा केला जातो? ख्रिश्चन धर्मात या दिवसाचे महत्त्व काय? त्याच्यामागे नेमका काय इतिहास आहे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. या सर्वांची माहिती घेण्यासाठी आम्ही ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून या गुड फ्रायडे बद्दल माहिती घेतली.

गुड फ्रायडे म्हणजे काय?: याबाबत बोलताना ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे म्हणाले की, गुड फ्रायडे हा दिवस संपूर्ण जगभरात ख्रिश्चन बांधव साजरा करतात. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभाला बांधण्यात आले होते तो हा दिवस आहे. त्या शुक्रवारला गुड फ्रायडे असे म्हटले जाते. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात आले तो दिवस ख्रिश्चन बांधव गुड म्हणून का साजरा करतात त्याला देखील कारण आहे. कारण, संपूर्ण मानव जातीच्या भल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त सुळावर चढले. त्यांनी शिक्षा पत्करली आणि संपूर्ण मानव जातीला शांततेचा आणि क्षमा करण्याचा संदेश दिला. म्हणून या दिवसाला ख्रिश्चन बांधव गुड फ्रायडे म्हणतात.

हे बायबलमध्ये आधीच लिहिले होते: तो केवळ शब्द बोलला आणि अखिल मानवजात उदयास आली, अशी ख्रिस्तांमध्ये श्रद्धा आहे. खिस्तांच्या श्रद्धेप्रमाणे अशा परमेश्वराचा पुत्र म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त. तो या पृथ्वीवर केवळ 33 वर्ष राहीला. परंतु आखिल मानवजातीला मानवता आणि शांतीचा संदेश दिला. त्याच्या उपदेशाने लोकांना जीवनाचा खरा मार्ग दिसू लागला. त्यामुळे काही धर्ममार्तंडाच्या पोटात दूखू लागले. बायबलनुसार त्याचा काहीही दोष नसताना आणि त्या काळच्या राजाची इच्छा नसतांना त्याला त्याला वधस्तंभी देण्यात आले. परंतु असे होणार हे बायबलमध्ये लिहले होते.

येशू ख्रिस्त आणि 7 वाक्य: विचार करा हाता पायात खिळे, पोटात भाला, डोक्यावर काट्यांचा मूकूट, प्रचंड वेदना तरीही तो म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर. कारण हे काय करतात यांना समजत नाही. वधस्तंभावरील त्या एका वाक्याने त्याने क्षमेमधील ताकद जगाला दिली. वधस्तंभावर मरते वेळी त्यांना सात वाक्य बोलली होती. ती संपूर्ण जगताला संदेश होता. आजही सर्व जगात या वाक्यावर गुड फ्रायडे या दिवशी मनन चिंतन चर्चमधून केले जाते. जगाला आज प्रभू येशूने दिलेल्या संदेशाची गरज आहे. तरच समाजात तसेच राष्ट्रांतील दंगली, जाळपोळ, वर्णभेद, जातीभेद, स्वार्थीवृति, मीपणा, अहंकारी वृत्ती, वैर संपेल.

येशू ख्रिस्त सर्वांचा: पुढे बोलताना आशिष यांनी सांगितले की, कारण प्रभू येशूने मानवजातीला अधिक महत्त्व दिले, जात व्यवस्थेला नव्हे. म्हणून आजही प्रभू येशू जवळ कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने योग्य ते प्रार्थनापूर्वक मागितल्यास तो देतोच. प्रभू येशूने कधीही अंधविश्वासाला थारा दिला नाही. म्हणून कोणीही त्याला फक्त ख्रिश्चनांचा देव म्हणून बंधनात बांधू नये. कारण तो सर्व मानवजातीचा आहे. सर्वाचा त्याच्यावर सारखाच अधिकार आहे.

हेही वाचा: Good Friday २०२३ गुड फ्रायडेलाच काळा दिवस का म्हटले जाते काय आहे इतिहास जाणून घ्या कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.