ETV Bharat / state

जेद्दाहहून मेणात लपवून आणलेलं 4 किलो सोनं मुंबई विमानतळावर जप्त; डीआरआयची कारवाई - मुंबई युनिट

Gold Seized by DRI : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन संशयित परवाशांची तपासणी केली असता, त्यांच्याकडून चार किलो सोनं जप्त करण्यात आलंय. याप्रकरणी चार जणांना अटकही करण्यात आलीय.

Gold Seized by DRI
Gold Seized by DRI
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 6:46 AM IST

Updated : Jan 17, 2024, 11:43 AM IST

मुंबई Gold Seized by DRI : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटनं मुंबई विमानतळावर कारवाई करत चार किलो सोनं जप्त केलंय. तसंच याप्रकरणी चार जणांना अटक देखील केलीय. जप्त केलेल्या चार किलो सोन्याची किंमत 2 कोटी 58 लाख असल्याची माहिती डीआरआयचे अधिकारी प्रवीण जिंदल यांनी दिली.

संशयितांच्या झाडाझडतीत सापडलं 4 किलो सोनं : डीआरआयनं मुंबई विमानतळावर 2 कोटी लाख रुपयांचं 4 किलो तस्करीचं सोनं जप्त करत 4 जणांना अटक केलीय. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई झोनल युनिटच्या अधिकार्‍यांनी 16 जानेवारीला जेद्दाहहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं आलेल्या दोन संशयित प्रवाशांना रोखलं. डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून या संशयितांची झडती घेण्यात आली. यात मेणाच्या स्वरुपात 1 किलो सोन्याची पावडर लपवलेली आढळून आली. दोन्ही प्रवाश्यांच्या आतील कपड्यांमध्ये (अंतर्वस्त्र) खास शिवलेले होते. यातून त्यांच्याकडून तस्करीचं सोनं जप्त करण्यात आलं. तसंच या व्यक्तींच्या सामानाच्या झडतीदरम्यान, अधिकाऱ्यांनी नेहमीपेक्षा जड असल्याच्या संशयातून 3 मिक्सर ग्राइंडरची तपासणी केली. मिक्सरचा भाग उघडला असता त्यामध्ये सुमारे 2 किलो सोन्याचे तुकडे लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अशा प्रकारे 2 कोटी 59 लाख रुपयांचे 4 किलो तस्करीचं सोनं जप्त करण्यात आलंय.

चार जणांना अटक : विमानतळाबाहेर दोन व्यक्ती प्रवाशांकडून सोनं घेण्यासाठी येत असल्याचंही तपासादरम्यान निष्पन्न झालं. त्यानुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि सोनं घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींना अडवलं. या व्यक्तींनी आपला गुन्हा कबूल केला. सीमाशुल्क कायदा 1962 च्या संबंधित तरतुदींनुसार दोन प्रवासी आणि सोनं घेण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आलीय. सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या वाढत्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी डीआरआयनं हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडलं.

हेही वाचा :

  1. Gold Smuggling : सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; १९ कोटींचे सोनं जप्त, वाराणसी, नागपूर व मुंबईत झाली कारवाई
  2. Gold seized at Mumbai Airport : मुंबई विमानतळावर परदेशी महिलेकडून १.६३ कोटी रुपयांचं सोनं जप्त
  3. Gold smuggling: दुबईतून आलेल्या 8 प्रवाशांकडून 3.2 कोटींचे सोने जप्त; मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई

Last Updated : Jan 17, 2024, 11:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.