मुंबई : म्हादई नदीवरुन महाराष्ट्र, कर्नाटक, आणि गोवा या तीन राज्यात वाद सुरू आहे. कर्नाटकात उगम पावणारी म्हादई नदीचा समुद्रापर्यंतचा 111 किलोमीटरचा प्रवास करत ही नदी महाराष्ट्र ,गोवा या राज्यातून समुद्राला भेटते. या नदीच्या पाण्यासाठी तीन राज्यांचा लढा सुरू आहे. या वादावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी दिलासा देणारी बातमी दिली आहे. गोवा आणि महाराष्ट्र हे दोघे भाऊ-भाऊ आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच म्हादई नदीच्या पाण्यासाठीचा लढा हा तीन राज्यांचा प्रश्न आहे आणि हा लढा महाराष्ट्र आणि गोवा एकत्रित लढतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एका दशकाच्या कालखंडानंतर बैठक : महाराष्ट्रातील तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक सुमारे एका दशकाच्या कालखंडानंतर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते. म्हादई नदीच्या पाण्यासाठीचा लढा हा तीन राज्यांचा प्रश्न आहे आणि हा लढा महाराष्ट्र आणि गोवा एकत्रित लढतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
गोवा आणि महाराष्ट्र एकत्रित : शिंदे म्हणाले की, गोवा आणि महाराष्ट्राचे नाते भावांसारखे आहे. म्हादईच्या पाण्यासाठीचा लढा कर्नाटकविरोधात गोवा आणि महाराष्ट्र एकत्रित मिळून लढतील. तिलारी धरण हे महाराष्ट्रात आहे. या तिलारी कालव्यातून गोव्याला पाणी पुरवठा होतो. बार्देश, पेडणे आणि डिचोली तालुक्यातील काही भागात हा पाणीपुरवठा केला जातो. म्हदई नदीचा 78 टक्के भाग कर्नाटकात असून कर्नाटक त्यावर धरण बांधत आहे. याला गोवा आणि महाराष्ट्राने विरोध दर्शवला आहे.
गोव्यासाठी अस्मितेचा मुद्दा : दरम्यान गेल्या काही काळात म्हादई प्रकल्पाच्या नवीन डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर कर्नाटकने या मुद्द्यावर आक्रमकपणे हालचाली सुरू केल्या आहेत. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही केंद्रीय नेत्यांची भेट घेत आपली बाजू मांडली. त्यातच केंद्र सरकारने म्हादई प्रवाह या प्राधिकरणाची स्थापना केली असून त्याचे कार्यालय सुद्धा पणजीमध्ये होणार आहे. अशात म्हादई हा गोव्यासाठी अस्मितेचा प्रश्न तर आहेच पण गोव्याच्या एकूण पर्यावरणावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच कारणामुळे म्हादई बचावासाठी चळवळही गोव्यात उभी राहिली आहे.
म्हादई नदीची तीन राज्यातील वाटणी? : म्हादई नदी जरी कर्नाटकात उगम पावते, पण या नदीचा 18 टक्के भाग हा कर्नाटकात तर 4 टक्के भाग महाराष्ट्राच्या हद्दीत आहे. तर गोवा राज्यात उर्वरित 78 टक्के भाग येतो. केंद्र सरकारने या प्रकल्पाच्या अहवालाला संमती दिल्यानंतर आता कर्नाटक सरकारने धरण बांधण्याची तयारी सुरू केली आहे. पण त्यासाठी त्यांना संमती देत असताना प्राधिकरण आणि लवादाने कर्नाटकवर काही बंधनंही लादली आहेत. परंतु एकदा का मान्यता मिळाली त्यानंतर कर्नाटक सरकार ही बंधने पाळेल की नाही? याची शाश्वती गोवा सरकारला नसल्याने गोवा सरकारने म्हादई नदीवरच्या या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.
हेही वाचा -