ETV Bharat / state

जीएमआरटीची रेडिओ दुर्बीण मुंबईच्या प्रदर्शनात, मंगळावरचा टिपला होता पहिला रेडिओ संदेश - प्रदर्शन

जीएमआरटी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीपैकी एक आहे. नासा, इस्रो यांसारख्या मोठ्या अंतराळ संशोधन संस्थांनी याआधीही अनेकदा या दुर्बिणीची मदत घेतली होती.

जीएमआरटीची रेडिओ दुर्बिण मुंबईच्या प्रदर्शनात, मंगळावरचा टिपला होता रेडिओ संदेश
author img

By

Published : May 8, 2019, 3:19 PM IST

मुंबई - जीएमआरटी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीपैकी एक आहे. नासा, इस्रो यांसारख्या मोठ्या अंतराळ संशोधन संस्थांनी याआधीही अनेकदा या दुर्बिणीची मदत घेतली होती. जीएमआरटीची ही दुर्बीण मुंबईच्या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात नारायणगावजवळ खोडद येथे असलेल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे खगोलवैज्ञानिकांनी विश्वातील खगोलीय घटनांचा शोध लावला आहे. त्यात २ जास्त वस्तुमानाची कृष्णविवरे व पृथ्वीपासून २ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या महाकाय दीर्घिकांची टक्कर यांचा समावेश आहे, असे येथील विज्ञान अधिकारी डॉ. जेके सोलंकी यांनी सांगितले.

जीएमआरटीची रेडिओ दुर्बिण मुंबईच्या प्रदर्शनात, मंगळावरचा टिपला होता रेडिओ संदेश

इंटरफेरमेट्री (Interferometry) चे तत्त्व वापरणारी अशीच एक अक्षरश: महाकाय, जायंट दुर्बीण आपल्या पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यात खोडद या ठिकाणी आहे. तिचे नाव जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT), म्हणजेच मीटर तरंगलांबी असणार्‍या लहरींचा वापर करणारी महाकाय दुर्बीण. साधारणपणे २० सेमी ते २ मीटर तरंगलांबी असलेल्या रेडिओ लहरींचा अभ्यास येथे केला जातो. जीएमआरटीमध्ये ४५ मीटर्स व्यास असणारे, ३० डिश अँटेना आहेत. त्यापैकी १४ अँटेना केंद्रस्थानी असलेल्या १ चौरस किमी क्षेत्रफळात ( central square मध्ये) आहेत,तर Y अक्षराच्या आकारात पसरलेल्या ३ भुजांवर एकूण १६ अँटेना आहेत.

या भुजा साधारणपणे प्रत्येकी १४ किमी लांब आहेत. अशा प्रकारे या अँटेना बसवण्याचे कारण Aperture synthesis या संकल्पनेत आहे. याच्या फार खोलात न जाता आपण एवढेच लक्षात घेऊ, की एकमेकांपासून क्ष अंतरावर असलेल्या २ किंवा अधिक रेडिओ अँटेनांनी एखाद्या रेडिओ स्त्रोताची, तो स्त्रोत उगवल्यापासून मावळेपर्यंत पुरेशी जास्त निरीक्षणे घेतली, तर त्या निरीक्षणांमधून मिळणारा एकत्रित निष्कर्ष वापरून, त्यावर गणिती प्रक्रिया करून त्या रेडिओ स्त्रोताची जी प्रतिमा तयार होते. ती जवळजवळ क्ष व्यासाच्या एकाच मोठ्या दुर्बिणीतून निरीक्षण घेऊन तयार केलेल्या प्रतिमेइतकी चांगली करता येते, असे येथील विज्ञान अधिकारी डॉ. जेके सोलंकी यांनी सांगितले.

मंगळावरून पाठवलेला पहिला रेडिओ संदेश टिपला होता-

नासाने अंतराळात मंगळावर सोडलेल्या 'MARS ROVER'चं नियंत्रण, संदेश देवाण-घेवाण तसेच संयमन हे जीएमआरटीनेच केले होते. युरोपियन स्पेस एजन्सीनेही जीएमआरटीची मदत घेतली होती. युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) रोव्हरने मंगळावरून पाठवलेला रेडिओ संदेश पुण्याच्या रेडिओ टेलिस्कोपने म्हणजे जीएमआरटीने टिपला आहे.

ईएसएच यानाने छोटा रोव्हर मंगळावर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. या महत्त्वाच्या टप्प्यावर रोव्हरचा पृथ्वीशी संपर्काचा मार्ग म्हणून जीएमआरटीची भूमिका महत्त्वाची ठरली. रोव्हर मंगळावर उतरताना त्याने पाठवलेला पहिला रेडिओ संदेश जीएमआरटीनेच टिपला होता.

Intro:nullBody:MH_GMRT_121_Salanki8.5.19

जीएमआरटीची दुर्बिण मुंबईच्या प्रदर्शनात

मुंबई: जीएमआरटी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणींपैकी एक आहे. नासा, इस्रो यांसारख्या मोठ्या अंतराळ संशोधन संस्थांनी याआधीही अनेकदा या दुर्बिणीची मदत घेतली होती. जीएमआरटीची दुर्बिण मुंबईच्या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्य़ात नारायणगावजवळ खोडद येथे असलेल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे खगोलवैज्ञानिकांनी विश्वातील खगोलीय घटनांचा शोध लावला आहेत. त्यात दोन जास्त वस्तुमानाची कृष्णविवरे व पृथ्वीपासून दोन अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या महाकाय दीर्घिकांची टक्कर यांचा समावेश आहे, असं येथील विज्ञान अधिकारी डॉ. जेके सोलंकी यांनी सांगितले.

Interferometry चं तत्त्व वापरणारी अशीच एक अक्षरश: महाकाय, जायंट दुर्बीण आपल्या पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यात खोडद या ठिकाणी आहे. तिचं नाव जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT), म्हणजेच मीटर तरंगलांबी असणार्‍या लहरींचा वापर करणारी महाकाय दुर्बीण. साधारणपणे २० सेमी ते २ मीटर तरंगलांबी असलेल्या रेडिओ लहरींचा अभ्यास येथे केला जातो. जीएमआरटीमध्ये ४५ मीटर्स व्यास असणारे, ३० डिश अँटेना आहेत. त्यापैकी १४ अँटेना केंद्रस्थानी असलेल्या १ चौरस किमी क्षेत्रफळात ( central square मध्ये) आहेत,तर Y अक्षराच्या आकारात पसरलेल्या ३ भुजांवर एकूण १६ अँटेना आहेत. या भुजा साधारणपणे प्रत्येकी १४ किमी लांब आहेत. अशा प्रकारे या अँटेना बसवण्याचे कारण Aperture synthesis या संकल्पनेत आहे. याच्या फार खोलात न जाता आपण एवढेच लक्षात घेऊ, की एकमेकांपासून क्ष अंतरावर असलेल्या २ किंवा अधिक रेडिओ अँटेनांनी एखाद्या रेडिओ स्त्रोताची, तो स्त्रोत उगवल्यापासून मावळेपर्यंत पुरेशी जास्त निरीक्षणे घेतली, तर त्या निरीक्षणांमधून मिळणारा एकत्रित निष्कर्ष वापरून, त्यावर गणिती प्रक्रिया करून त्या रेडिओ स्त्रोताची जी प्रतिमा तयार होते, ती जवळजवळ क्ष व्यासाच्या एकाच मोठ्या दुर्बिणीतून निरीक्षण घेऊन तयार केलेल्या प्रतिमेइतकी चांगली करता येते, असं येथील विज्ञान अधिकारी डॉ. जेके सोलंकी यांनी सांगितले.

नासाने अंतराळात मंगळावर सोडलेल्या 'MARS ROVER'चं नियंत्रण, संदेश देवाण-घेवाण तसेच संयमन हे जीएमआरटीनंच केलं होतं. आता युरोपियन स्पेस एजन्सीनेही जीएमआरटीची मदत घेतली होती.
युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) रोव्हरने मंगळावरून पाठवलेला रेडिओ संदेश पुण्याच्या रेडिओ टेलिस्कोपनं म्हणजे जीएमआरटीनं टिपला आहे.
ईएसएचं यानानं छोटा रोव्हर मंगळावर उतरवण्याचा प्रयत्न केला होता या महत्त्वाच्या टप्प्यावर रोव्हरचा पृथ्वीशी संपर्काचा मार्ग म्हणून जीएमआरटीची भूमिका महत्त्वाची ठरली. रोव्हर मंगळावर उतरताना त्यानं पाठवलेला पहिला रेडिओ संदेश जीएमआरटीनेच टिपला होता.

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.