ETV Bharat / state

शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांचे अनुदान द्या, राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - devendra fadnavis

राज्यात अनेक ठिकाणी सुरळीत पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दिली

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
author img

By

Published : Jul 17, 2019, 12:08 PM IST

मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी सुरळीत पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा पीक कर्जाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

राज्य सरकारला ५ वर्षे होत आली आहेत. मात्र, हे सरकार सपशेल फेल ठरले आहे. सरकारच्या विविध योजनांचा बोजवारा उडाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांबाबत निवेदन सादर केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

केंद्र सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजनेची घोषणा केली. मात्र, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. या अनुदानाचा पहिला टप्पा म्हणून २ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षीत होते. मात्र, शेतकऱ्यांना एक फुटकी कवडी देखील मिळाली नसल्याचे मुंडे म्हणाले.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील स्वस्त धान्य दुकानामार्फत देण्यात येणाऱ्या लाभांपासून ५० लाखांपेक्षा जास्त कुटुंब वंचित आहेत. याला पूर्णपणे केंद्रातील आणि राज्यातील सरकार जबाबदार आहे. या गोष्टीचा पाठपुरावा करून प्रश्नाची सोडवणूक करावी अशी आमची मागणी आहे.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.