ETV Bharat / state

Gautam Adani meets Raj Thackeray उद्योगपती गौतम अदानी राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीनंतर ठाकरे थेट फडणवीसांच्या बंगल्यावर!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Raj Thackeray Devendra Fadnavis meet ) यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यावर भेट घेतली. जवळपास अर्धा वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीपूर्वी राज ठाकरे यांनी मंगळवारी संध्याकाळी उद्योगपती गौतम अदानी ( Raj Thackeray Devendra Gautam Adani meet ) यांचीही भेट घेतली होती. राज ठाकरे यांचे कुटुंब हे अदानी कुटुंबासोबत एकत्र दिसून आले आहेत.

Gautam Adani meets Raj Thackeray
गौतम अदानी यांच्यासोबत राज ठाकरे कुटुंब
author img

By

Published : Jan 11, 2023, 7:21 AM IST

मुंबई : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यातही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ( Raj Thackeray role in BMC election ) भेट घेतली होती. ऑक्टोबर महिन्यातच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोनदा भेट झाली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या भेटीतून बीएमसी निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या युतीसंदर्भात चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मागील काही दिवसात अदानी 4 नेत्यांच्या भेटीला उद्योगपती गौतम अदानी यांनी देखील ( Gautam Adanis meeting with MH leaders ) मागील काही दिवसात तीन मोठ्या नेत्यांची चर्चा केली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजप नेते आशिष शेलार यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन गौतम अदानी यांनी चर्चा केली होती. त्यानंतर लगेचच आता अदानी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याने व अदानी यांच्या भेटीनंतर अगदी काहीच वेळात राज ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला रवाना झाले. राज ठाकरेंच्या एकाच दिवसात दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या आहेत. त्यामुळे गौतम अदानी व राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

धारावी प्रकल्पाचे काम अदानी ग्रुपकडे येण्याची शक्यता आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी 557 एकर क्षेत्रफळात वसलेली आहे. या झोपडपट्टीचा पुनर्विकास ह अदानी समुहाकडून ( Adani Group ) करण्यात येणार आहे. अदानी समुहाने पुनर्विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांची सर्वाधिक बोली ( Adani group wins Bid of Dharavi Redevelopment ) लावली. बोलीमध्ये तीन कंपन्या होत्या. सर्वाधिक किंमत अदानी समूहाने दिली. त्यामुळे निविदा त्यांना मिळणार ( Dharavi Redevelopment Project news ) हे जवळपास निश्चित झाले आहे.

महाधिवक्ताच्या शिफारशीनुसार सेकिलिंकची बोली झाली होती रद्द 2018 मध्ये जागतिक पातळीवर धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्याकरिता दुबई येथील सेकिलिंक कंपनीने सर्वाधिक बोली लावली. मात्र त्या वेळच्या तत्कालीन शासनाने महाधिवक्ताच्या शिफारशीनुसार बोली ऑक्टोबर 2020 कालावधीत रद्द केली. या बोलीमध्ये सर्वाधिक किंमत दुबईच्याच कंपनीने लावलेली होती. तर अदानी उद्योग समूहाने कमी किंमत लावली होती. त्यापूर्वी 2004 आणि 2009 तसेच 2011 या कालावधीत धारावी पुनर्विकासाबाबत तीन वेळा निविदा बोली लावण्यात आली होती. मात्र त्याला कोणत्याही मोठ्या उद्योग समूहाने प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर 2016 या वर्षी कोणत्याही उद्योग ( Dharavi project tender ) समूहांना निविदा करिता प्रतिसाद मिळाला नव्हता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.