मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांनी वर्षा बंगल्यावर ( Varsha bungalow ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ( Gautam Adani meet CM ) भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान ( Gautam Adani meet Eknath Shinde ) उद्योग मंत्री उदय सामंतदेखील उपस्थित होते. विरोधकांकडून महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाण्यावरून सरकारला नेहमीच धारेवर जाते. त्यातच गौतम आदाने व मुख्यमंत्री यांची भेट झाल्याने सोबतच उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
शिंदे फडणवीस सरकार सध्या कोणत्या ना कोणत्या ( Uday Samant on Gautam Adani meet ) कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुजरातला गेल्याने महाविकास आघाडीचे नेत्यांकडून शिंदे फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हाच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता शिंदे फडणवीस सरकारने कंबर कसल्याच पाहायला मिळते. मंगळवारी रात्री उशिरा प्रसिद्ध उद्योगपती गौतम आदानी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती आता समोर येत आहे. विशेष म्हणजे या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंतदेखील उपस्थित होते.
राज्याच्या विकासासंदर्भात चर्चा बैठकी संदर्भात रात्री उशिरा उद्योग मंत्री उदय संबंध यांनी काही पत्रकारांना माहिती दिली. या माहितीनुसार गौतम आदानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आले होते. या दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली. आगामी काळात या चर्चेत काय घडलं हे जनतेसमोर येईल. राज्याच्या विकास संदर्भात मुख्यमंत्री व आदाने या दोघांमध्ये चर्चा झाली. गौतम आदानी हे फक्त राज्यातीलच नाहीतर देशातील सर्वात मोठे उद्योगपती आहेत. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती उद्योग मंत्र्यांनी दिली.
त्यांच्या काळात महाराष्ट्राचे प्रकल्प बाहेर गेले : या बैठकीनंतर उद्योग मंत्र्यांनी विरोधी पक्षावर टीका करायची संधी सोडली नाही. मुख्यमंत्री व गौतम आदानी यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती देत असतानाच त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली. सामंत म्हणाले की, राज्यातील प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गुजरातला गेले. विरोधकांकडून जनतेचे दिशाभूल केली जाते. मागच्या अडीच वर्षाच्या सरकारच्या काळातच हे सर्व प्रकल्प बाहेर गेले आहेत. उद्योग विभागाकडून त्याची श्वेतपत्रिका लवकरच जाहीर केली जाईल, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
महाराष्ट्राच्या वाट्याला आता नेमके काय येणार : दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुजरातला गेल्याने महाविकास आघाडीचे नेत्यांकडून शिंदे फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. वेदांत फॉक्सकॉन असेल बल्क ट्रक पार्क, टाटा एअरबस सारखे मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे फडणवीस सरकार टीकेच धनी बनले. महाविकास आघाडीकडून तरुणांच्या बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत, आम्ही तरुणांना रोजगार देण्यासाठीच हे प्रकल्प आणत होतो अशा प्रतिक्रिया माध्यमांना दिल्या आहेत. त्यामुळे तरुणाईत देखील मोठा रोष पाहायला मिळतो. त्यामुळे उद्योगपती व मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या वाट्याला आता नेमके काय येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
अदानी ही पहिल्या पिढीतील उद्योजक आहे आणि अदानी समूहामध्ये 7 सार्वजनिक सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश आहे, ज्यात ऊर्जा, बंदरे आणि लॉजिस्टिक, खाण आणि संसाधने, गॅस, संरक्षण आणि एरोस्पेस आणि विमानतळ यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रत्येक व्यवसाय विभागात, उद्योग समूहाने भारतात सर्वोच्च स्थान प्रस्थापित केले आहे. अदानी समूह हा भारतातील तिसरा सर्वात मोठा समूह (रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा समूहानंतर) आहे.
दरम्यान, केंद्रातील भाजपा सरकार उद्योजक अदानी यांना उद्योग क्षेत्रात झुकते माप देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीतील काही नेते करत आहेत. दुसरीकडे बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह उद्योगपती गौतम अदानी एकाच व्यासपीठावर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.