ETV Bharat / state

सुशांतसिंह प्रकरण : ईडी कार्यालयात गौरव आर्यांची कसून चौकशी - sushant singh rajput death

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात गोव्याचे उद्योजक गौरव आर्य यांची चौकशी ईडीने केली आहे. गौरव आर्य यांचे नाव रियाशी केलेल्या ड्रग्जविषयी व्हॉट्सअ‌ॅप चॅटवर आले होते. यामुळे ईडीने चौकशी सुरू केली आहे. याशिवाय सुशांतसिंह राजपूतची बहिण मितू सिंह हिची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे.

Gaurav Arya was interrogated in the ED office for more than six hours
सुशांतसिंह
author img

By

Published : Aug 31, 2020, 5:12 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्स संबंधात आज (सोमवार) ईडीने गोव्याचे उद्योजक गौरव आर्य यांची चौकशी केली. गौरव आर्य यांचे नाव रियाशी केलेल्या ड्रग्जविषयी व्हॉट्सअ‌ॅप चॅटवर आले होते. यामुळे ईडीने आर्य यांची तब्बल ६ तास चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कपिल झवेरी आणि गौरव आर्य यांनी गोव्यातील बर्‍याच ठिकाणी एकत्र गुंतवणूक केली आहे. त्या ठिकाणांची नावे आणि किती गुंतवणूक केली गेली आहे, याचा शोध घेण्याचा ईडी प्रयत्न करत आहे. कपिल झवेरी गोव्यातील ड्रग्ज प्रकरणात अडकले आहेत.

अधिक माहिती देताना आमचे प्रतिनिधी केदारेश्वर शिंत्रे...

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सलग तीन दिवस रिया चक्रवर्तीची सीबीआयने चौकशी केली. यानंतर आता सुशांतसिंह राजपूत याची बहिण मितू सिंह हिला सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहे. मुंबईतील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआयचे पथक थांबले असून या ठिकाणी मितू सिंहची चौकशी करण्यात येणार आहे. तर रविवारी ९ तास चौकशी केल्यानंतर रिया चक्रवर्तीची पुन्हा सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. आज (सोमवारी) मितू सिंह चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात हजर झाली आहे.

रिया चक्रवर्तीची सलग तीन दिवस चौकशी
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. या तपासाअंतर्गत, शनिवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुमारे ७ तास चौकशी करण्यात आली. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी ही तिची चौकशी करण्यात आली आहे. यापुर्वी शुक्रवारीही तब्बल 5 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी देखील रियाला तब्बल ९ तास चौकशीला सामोरे जावे लागले होते. यावेळी रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी व नीरज सिंग हेसुद्धा सीबीआयच्या पथकासमोर चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांचीही सीबीआयने कसून चौकशी केली आहे.

हेही वाचा - सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर संदीप सिंहने ब्रिफिंग केलेला नेता कोण?; सचिन सावंतांचा भाजपाला सवाल

हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरण : मितु सिंगची होणार सीबीआय चौकशी, रिया कार्यालयात हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.