ETV Bharat / state

गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात कचरा फेकण भोवलं, महापालिकेनं ठोठावला 10 हजार रुपयांचा दंड, गुन्हा दाखल - गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात कचरा फेकला

Gateway of India Garbage Issue : समुद्रात टाकलेल्या कचऱ्याप्रकरणी हाजी अब्दुल रहमान शाह कादरी यांना महापालिकेनं 10 हजाराचा दंड ठोठावला. हाजी अब्दुल रहमान शाह कादरी यांनी गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात कचरा फेकला होता.

Gateway of India Garbage Issue
कचरा फेकताना हाजी अब्दुल रहमान शाह कादरी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 9:25 AM IST

मुंबई Gateway of India Garbage Issue : मुंबई महापालिकेनं गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात कचरा फेकणाऱ्या व्यक्तीला 10 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. या व्यक्तीनं मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात कचरा टाकला होता. कचरा टाकल्याबद्दल महापालिकेनं लावलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे. दंड आकारण्याची कारवाई अ प्रभागाकडून करण्यात आली आहे. हाजी अब्दुल रहमान शाह कादरी असं दंड ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. समुद्रात कचरा फेकताना अज्ञात व्यक्तीनं हाजी अब्दुल रहमान शाह कादरीचा व्हिडिओ शूट केला होता. हा व्हायरल झालेला व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील शेअर केला. त्यामुळे महापालिकेनं या व्यक्तीचा शोध घेवून ही दंडात्मक कारवाई केली आहे.

गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात फेकला कचरा : महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टॅक्सीतून उतरुन गेट वे ऑफ इंडियाजवळ फुलांचा कचरा समुद्रात फेकताना दिसत आहे. महापालिकेनं मुंबई पोलिसांच्या मदतीनं व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. कचरा घेऊन आलेल्या टॅक्सीचा नंबर ट्रेस करून त्या व्यक्तीची ओळख पटली. 58 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये काही नागरिक टॅक्सीतून कचरा आणताना दिसत होते. मग ते गाडी समुद्राच्या किनाऱ्यावर उभी करतात, पूजेनंतर उरलेली सुकी फुलं, पिशवीत भरलेली सुकी फुलं आणि इतर वस्तू पटकन समुद्रात टाकून निघून जातात. एका व्यक्तीनं याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

उद्योगपती आनंद महिंद्रा केला शेअर : व्हायरल झालेल्या व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी त्यांनी मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेला टॅग केलं. यावेळी त्यांनी "हे पाहून दुःख झालं. पायाभूत सुविधा कितीही चांगल्या असल्या तरी, पण जोपर्यंत आपण आपल्या सवयी सुधारत नाही, तोपर्यंत सकारात्मक बदल होणार नाही" असं आनंद महिंद्रा यांनी लिहिलं. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टनंतर मुंबई महापालिकेनं कारवाईला सुरुवात केली. महापालिकेनं पोलिसांच्या मदतीनं कचरा फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. महापालिकेनं टॅक्सीच्या वाहन क्रमांकावरून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला दंड ठोठावला आहे. या प्रकरणी हाजी अब्दुल रहमान शाह कादरी याच्यासह आणखी दोघांवर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अ‍ॅक्टच्या कलम 3 (2) (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. कोरोना काळात मुंबईतील जैविक कचरा वाढला; आतापर्यंत ६० लाख किलो कचऱ्याची विल्हेवाट
  2. Brihanmumbai Municipal Corporation : मुंबईत पाणी, कचरा आणि ड्रेनेजच्या तक्रारींत वाढ; 'या' संस्थेचा महापालिकेवर ठपका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.