मुंबई Gas Cylinder Blast : मुंबईतील वांद्रे परिसरातून एक मोठी घटना समोर येत आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झालाय. त्यामुळं भीषण आग लागली असून, या आगीत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आलीय. हा एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट कशामुळं झाला? अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी या घटनेनं परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झालंय.
घरात सिंलेडरचा स्पोट : मुंबई अग्निशमन विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी अग्निशमन विभागाला वांद्रे येथील फिट्टर गल्ली इथं आग लागल्याची माहिती मिळाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या 6 गाड्या घटनस्थळी दाखल झाल्या. या परिसरातील चाळीतील एका 10 बाय 10 च्या घरातील एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला. ही आग वाढली आणि इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, कपड्यांचा साठा इत्यादींपर्यंतच आग लागली. त्यामुळं ही आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि यात पाच जण जखमी झाले आहेत.
जखमी उपाचारासाठी रुग्णालयात दाखल : या आगीतील जखमींना नजीकच्या भाभा हॉस्पिटल इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, जखमिंची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पालिकेनं दिलीय. जखमींमध्ये निखिल दास (53), राकेश शर्मा (38), अँथनी थेंगल (65), कालीचरण कनोजिया (54), शान अली सिद्धीकी (31) यांचा समावेश आहे. या घटनेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पालिकेनं दिलीय.
हेही वाचा :