ETV Bharat / state

मुंबईत पावसाची विश्रांती; बाप्पांचे विसर्जन उत्साहात पार पडणार... - गणेश दर्शन

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार बरसणारा पाऊस सध्या थांबला आहे. यामुळे सात दिवस विराजमान झालेल्या गणपतींना मनाप्रमाणे निरोप देता येत असल्याने भाविकदेखील उत्साहात आहेत.

विसर्जन
author img

By

Published : Sep 8, 2019, 5:42 PM IST

मुंबई - गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या पावसाने आज सातव्या दिवशी जरा विश्रांती घेतलेली आहे. यामुळे सात दिवस विराजमान झालेल्या गणपतींचे विसर्जन उत्साहात पार पडणार असल्यामुळे मुंबईकर गणेशभक्त आनंदी आहेत. दीड दिवस व पाच दिवसांच्या गणपतींना विसर्जनाच्यावेळी पडलेल्या पावसामुळे उत्साहात निरोप देता आला नाही. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुढील विसर्जन वाजत-गाजत करता येणार आहे.

गणपती विसर्जनाबाबतची माहिती देताना प्रतिनिधी

काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊसाची बॅटींग सुरू आहे. मात्र, आज पावसाने उघडीप दिली असून यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात गणेश दर्शनासाठी निघालेले आहेत. हवामान खात्याने रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर सकाळी काही भागात जोरदार सरी कोसळल्या होत्या. मात्र, दुपारी बारानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गणेश भक्तांना त्यांच्या लाडक्या बाप्पाला मनाप्रमाणे निरोप देता येणार असल्याने भाविकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

तर, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता असून भक्तांच्या उत्साहावर पावसाचे पाणी फिरणार असल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा - पुढच्या वर्षी लवकर या..! मुंबईत ४४ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन

Intro:मुंबई ।
गणेश चतुर्थी पासून सुरू झालेला पाऊस आज सातव्या दिवशी थांबलेला आहे. यामुळे सात दिवस विराजमान झालेल्या गणपतींचे विसर्जन उत्साहात होणार आहे. दीड दिवस व पाच दिवसांच्या विसर्जनाच्यावेळी पडलेल्या पावसामुळे विसर्जनावेळी उत्साहात निरोप देण्यात आला नव्हता. मात्र आज पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गणपती बाप्पाचे विसर्जन भाविकांना मनाप्रमाणे करता येणार आहेBody:काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. आज पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात गणेश दर्शनासाठी सुद्धा निघालेले आहेत हवामान खात्याने आज मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवला होता। मात्र सध्यातरी मुंबईत अशी स्थिती नाही आहे. सकाळी काही भागात जोरदार सही कोसळल्या होत्या. दुपारी बारानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.