ETV Bharat / state

शिवडीचा राजा गणपतीचा 'कलम 370 रद्द'वर 'नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट' देखावा - गणेशोत्सव

लोकमान्यांना अभिप्रेत असणारा गणेशोत्सव साजरा करण्याचे हे शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 68 वे वर्ष आहे.

नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट देखावा
author img

By

Published : Sep 5, 2019, 11:30 PM IST

मुंबई - शिवडीच्या राजाच्या गणपतीचा एक ज्वलंत देखावा गणपती यावर्षी उभारण्यात आला आहे. त्याची थीम आहे नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट. नुकतेच जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आले. त्यावर या मंडळाने डोळ्याचे पारणे फेडणारा देखावा बनवला आहे.

'नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट' देखावा

हेही वाचा - ठाण्यात 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारे बाप्पाची स्थापना

लोकमान्यांना अभिप्रेत असणारा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 68 वे वर्ष आहे. गेली 6 दशके सातत्याने मंडळ सामाजिक शैक्षणिक, कला आणि क्रीडा महोत्सव तसेच आपत्कालीन मदत यासारखे उपक्रम सातत्याने राबवत आहे.

महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा येथे आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यांना अनेक स्थरातून मदतीचा ओघ सुरू आहे. तसेच सामाजिक जबाबदारी ओळखून शिवडीचा राजा मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सांगली येथील मसुचीवाडी या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पूरग्रस्तांना शालेय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. शिवडीचा राजा हा सामाजिक देखाव्याचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. सामाजिक देखाव्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा वसा या मंडळाने घेतला आहे. त्यामुळेच 370 कलम यावर आधारित स्वातंत्र्याची पहाट या थीमवर त्यांनी यंदाचा देखावा बनवला आहे.

हेही वाचा - 'या' बाप्पाच्या भक्ताच्या नावावर आहे 'लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड'

त्यामुळे गेल्या काही वर्षात भारतावरच अवघ्या जगाचे राजकारण ढवळून काढणाऱ्या कलम 370 चा मागोवा घेत मंडळाने नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट हा वास्तवदर्शी देखावा साकारला आहे. कश्मीरमध्ये घर, जागा असण्यापेक्षा तेथील लोकांच्या मनात घर असणे, महत्त्वाचे आहे. हे देखाव्यातून स्पष्ट केलेले आहे. भारत सरकारच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचे देखील मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी स्वागत केले आहे.

Intro:
शिवडीचा राजा या गणपतीचे येथे हे 370 कलम रद्द झाल्यामुळे नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट यावर आधारित देखावा

शिवडीच्या राजाच्या गणपतीचा यावर्षी एक ज्वलंत देखावा गणपती परिसरात उभारण्यात आलेला आहे. त्याची थीम आहे नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट ..लोकमान्यांना अभिप्रेत असणारा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 68 वे वर्ष आहे .गेली सहा दशके सातत्याने मंडळ सामाजिक शैक्षणिक, कला आणि क्रीडा महोत्सव तसेच आपत्कालीन मदत यासारखे उपक्रम सातत्याने राबवत आहे. त्यामुळे नुकत्याच 370 कलम रद्द होऊन काश्मीर भारताचा एक भाग आहे. यावर त्यांनी डोळ्याचे पारणे फेडणारे देखावा यंदा मंडळाने बनवलेला आहे.

Body:तसेच नुकत्याच झालेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबांवर संकटाचे डोंगर कोसळले आपली सामाजिक जबाबदारी ओळखून शिवडीचा राजा मंडळाच्या पदाधिकारी व कार्य कार्यकर्ते यांनी सांगली येथून मसुचीवाडी या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पूरग्रस्तांना शालेय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. शिवडीचा राजा हा सामाजिक देखाव्याचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. सामाजिक देखाव्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा वसा या मंडळाने घेतलेल्या आहेत. त्यामुळेच 370 कलम यावर आधारित स्वातंत्र्याची पहाट या थीमवर त्यांनी यंदाचा देखावा बनवलेला आहे.

Conclusion:जगाच्या पाठीवर सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक भारत आणि याचा मुकुटमणी काश्मीर याचा स्वर्गाची भुरळ पडलेल्या अनेकांनी इथे राज्य केले. पण या नंदनवनाला दृष्ट लागली आणि 1947 पासून हा काश्मीर स्वर्ग रक्ताळलेला राहिला. कपाळावरील जखमी प्रमाणे काश्मीर देखील भारताच्या कपाळावरील भरभरीत जखम बनली. एकाच वेळी स्वातंत्र्य झालेली भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्र आहेत . त्यामुळे कश्मीरसाठी भारत व पाकिस्तान मिळवण्यासाठी काश्मीर हा कायम कळीचा मुद्दा बनला आणि त्यात काश्मीरमध्ये 35 ए व कलम 370 ची बसलेली ही गाठ यामुळे काश्मीरची होणारी हेळसांड पाहण्याशिवाय भारताकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.पण यंदाच्या सरकारने एक इतिहासिक निर्णय घेत 370 कलम रद्द करून काश्मीरला न्याय दिलेला आहे.

त्यामुळे गेले काही वर्ष भारतावरच अवघ्या जगाचे राजकारण ढवळून काढणाऱ्या कलम 370 चा मागोवा घेत मंडळाने नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट हा वास्तवदर्शी देखावा गणपती परिसरात साकारलेला आहे. कश्मीरमध्ये घर जागा असण्यापेक्षा तेथील लोकांच्या मनात घर असणे महत्त्वाचे हे या देखाव्यातून स्पष्ट केलेले आहे. भारत सरकारच्या कलम 370 रद्द करण्याच्या देण्याचे देखील स्वागत मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.