ETV Bharat / state

Gangster Suresh Pujari Police Custody : गँगस्टर सुरेश पुजारीच्या पोलीस कोठडीत 11 फेब्रुवारीपर्यंत वाढ - सुरेश पुजारी पोलीस कोठडी लेटेस्ट बातमी

मुंबईच्या फोर्ट परिसरातील व्यावसायिकाला गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गॅंगस्टर सुरेश पुजारी ( Gangster Suresh Pujari Arrested ) याला अटक केली. या प्रकरणात सुरेश पुजारी यांची मुंबई गुन्हे शाखेने पुन्हा कोठडी मागितली. ( Gangster Suresh Pujari Police Custody ) न्यायालयाने 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करून देण्यात आली आहे.

suresh pujari
सुरेश पुजारी
author img

By

Published : Feb 8, 2022, 4:08 PM IST

Updated : Feb 8, 2022, 4:33 PM IST

मुंबई - मुंबईच्या फोर्ट परिसरातील व्यावसायिकाला गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गॅंगस्टर सुरेश पुजारी ( Gangster Suresh Pujari Arrested ) याला अटक केली. या प्रकरणातील हे सातवी अटक असून गुन्हे शाखेने यापूर्वी सुरेश पुजारी टोळीच्या दोन हस्तकासह तीन शूटर्स आणि एका अल्पवयीन आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणात सुरेश पुजारी यांची मुंबई गुन्हे शाखेने पुन्हा कोठडी मागितली. ( Gangster Suresh Pujari Police Custody ) न्यायालयाने 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करून देण्यात आली आहे.

सुरेश पुजारीवर 51 गुन्हे दाखल -

गॅंगस्टर सुरेश पुजारी याच्या विरोधात मुंबईसह ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई अशा ठिकाणी एकूण 51 गुन्हे दाखल आहे. यातील 17 गुन्हे मुंबई पोलिसांकडे दाखल असून 10 गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा करत आहे. यात मोक्का कायद्यान्वये 6, खुनाच्या प्रयत्नात 3 आणि खंडणीच्या 4 गुन्ह्यांचा समावेश आहे. तर ठाणे पोलिसांकडे 30 राज्य दहशतवादी विरोधी पथकाकडे 2, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर पोलिसांकडे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

गुन्हे शाखेने या प्रकरणात मोक्का कायद्यान्वये कारवाई करत विशेष मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात सुरेश पुजारीला पहिल्या क्रमांकाचा आरोपी दाखवण्यात आले होते. खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या पथकाने सुरेश पुजारीचा ताबा एटीएसकडून घेतल्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक केली. न्यायालयाच्या मागील सुनावणीनंतर त्याची 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता पुन्हा 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा - Hijab Controversy In Karnataka : कर्नाटकात महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदी.. मुस्लिम मुलींनी दाखल केल्या उच्च न्यायालयात याचिका

काय आहे प्रकरण?

उल्हासनगर येथील रहिवासी असलेले व्यावसायिकाची फोर्ट परिसरात महागडे कॅमेरे विकण्याचे दुकान आहे. त्यांच्या या व्यावसायावर नजर पडलेल्या सुरेश पुजारी टोळीने 6 जानेवारी ते 19 जानेवारी 2018 या काळात 50 लाख रुपयांची खंडणीची मागणी करत धमकावले होते. विदेशातून थेट सुरेश पुजारीचा खंडणीसाठी फोन येऊन सुद्धा हा व्यावसायिक घाबरत नव्हता. अशा प्रकारची खंडणी न देणाऱ्या ठाण्याचे भिवंडी परिसरातील एक हॉटेल व्यवसायिकाच्या हॉटेलवर 10 जानेवारी 2018 च्या दुपारी पुजारीने 3 शूटरच्या मदतीने गोळीबार घडवून आणला.

गोळीबारात हॉटेलमधील रिसेप्शनिस्ट स्वरा शिरसाठ ही गंभीर जखमी झाली होती. ठाण्यातील गोळीबाराचे वृत्त प्रसिद्ध माध्यमावर झळकू लागल्यानंतर पुजारीने फोर्टमधील व्यावसायिकाला अशाप्रकारची गोळी घालून ठार मारण्याची धमकी देत रक्कम वाढून 1 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केले. तुला ठार मारून तुझ्या मुलांकडून खंडणी वसूल करेन, अशी धमकी पुजारीने दिल्याने घाबरलेल्या व्यावसायिकाने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने एक अल्पवयीनसह एकूण 6 आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून दोन पिस्तुले, 3 मॅगझीन आणि 5 जिवंत काडतुसे हस्तगत केली होती.

Last Updated : Feb 8, 2022, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.