मंबई - गॅगस्टर गणेश शिंदेची ( Gagster Ganesh Shinde ) न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली ( Gangster Ganesh Shinde has been sent to judicial custody ) आहे. मुंबईतील एका बड्या व्यावसायिकाला धमकी देणार्या गॅगस्टर गणेश शिंदेला खंडणी विरोधी पथकाने केली अटक होती. प्रसिद्ध व्यावसायिक सुधाकर शेट्टी ( Renowned businessman Sudhakar Shetty ) यांना शिंदेने धमकावले होते. शेट्टी हे वांद्रेच्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत असताना गणेश शिंदे याच्यासह काही जणांनी त्यांना पैशांसाठी धमकावल्याची तक्रार त्यांनी वांद्रे पोलिसात दिली होती.
शिंदेला न्यायालयीन कोठडी - या प्रकरणी शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिसात गणेश शिंदे व इतर आरोपींविरोधात ३८५,४५२,५०६(२), ३४ भादवि कलमांतर्गग गुन्हा दाखल केला होता. पुढे या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपवल्यानंतर पोलिसांनी शिंदेला अटक करत न्यायालयात हजर केले. या प्रकरणी शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिसात गणेश शिंदे इतर आरोपींविरोधात ३८५,४५२,५०६(२), ३४ भादवि कलमांतर्गग गुन्हा दाखल केला होता. पुढे या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपवल्यानंतर पोलिसांनी शिंदेला अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शिंदेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.