ETV Bharat / state

विघ्नहर्त्याच्या भक्तांवर कोरोनाचे विघ्न, साध्या पद्धतीने बाप्पाचे आगमन - बाप्पा मोरया बातमी

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात शनिवारी (22 ऑगस्ट) राज्यात सर्वत्र गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. मात्र, यंदाचा गणेशोत्सव कोरोनामुळे नेहमीप्रमाणे नसून साध्यापद्धती साजरा करण्यात येत आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Aug 22, 2020, 10:59 PM IST

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात शनिवारी (22 ऑगस्ट) राज्यात सर्वत्र गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. मात्र, यंदाचा गणेशोत्सव कोरोनामुळे नेहमीप्रमाणे नसून साध्यापद्धती साजरा करण्यात येत आहे.

मुंबई - आज मुंबईकरांनी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन केले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान, थोर दंग झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले. मात्र, कोरोनाचे काहीसे सावट यावर्षीच्या गणेशोत्सवावर आहे.

mum
कोरोनामुळे मास्क लावून बाप्पांना घरी नेताना मुंबईकर

सांगली - घरोघरी गणपती बाप्पा आज विराजमान झाले. मात्र, यंदा कोरोनाचे मोठे सावट सांगलीतीलही गणेशोत्सवामध्ये दिसत आहे. भक्तिमय वातावरणात साध्या पद्धतीने गणेशोत्सव पार पडत आहे. कोणत्याही जल्लोषाविना बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान झाले.

sangli
सांगलीतील बालगोपाळांचा बाप्पांना घरी नेतानाचा उत्साह

नंदुरबार - जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गणरायाचे स्वागत करून स्थापना करण्यात आली. नंदुरबार शहरातील मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची विधीवत पूजा करून स्थापना करण्यात आली. यावेळी मंडळातील पदाधिकारी, पुजारी व अनेक गणेशभक्त उपस्थित होते.

nandurbar
नंदुरबार शहरातील मानाचा बाप्पा

येवला (नाशिक) - शहरात आज (22 ऑगस्ट) गणपती स्थापनेच्या दिवशी अनेक गणेशभक्त घरगुती गणरायाची मूर्ती घेऊन जाताना दिसत होते. तर काही ठिकाणी आपल्या गृहिणीला व्हिडिओ कॉल करून त्याद्वारे कोणता गणपती आणू अशा पद्धतीने गणेशमूर्ती खरेदी करताना गणेशभक्त दिसत होते.

yeola
लाडक्या बाप्पांना नेताना चिमुकले

वर्धा - वर्ध्याच्या राजा सावंगी मेघेचा गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने आकर्षक रोषणाई आणि दणक्यात साजरा होणारा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचा वध करताना बाप्पांची मूर्ती डोळ्यात भरणारी आहे. सोबतचा बाप्पांच्या मूर्तीमागे कोरोना योद्धाची कलाकृती साकारण्यात आली आहे.

wardha
कोरोनाचा अंत करणारे बाप्पा

पालघर - 'गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आज पालघर जिल्ह्यात घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने घरोघरी आणि गणेश मंडळांमध्ये गणरायांचे मंगलमय वातावरणात आगमन झाले आहे.

palghar
पालघरमधील बाप्पा

धुळे - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात घरोघरी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. यावेळी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करत आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत केले. यंदा कोरोना आजाराचा परिणाम गणेशोत्सवावर दिसून आला.

dhule
धुळ्यातील बाप्पा

अमरावती - यावर्षी पाहिल्यांदाच अमरावती शहर आणि जिल्ह्यात विघ्नहर्ता गणरायाचे आगमन अगदी शांततेत झाले आहे. कोरोनाचे विघ्न कायम असताना दमदार पाऊस सुरू असल्याने साध्या पद्धतीने आगमन करण्यात आले.

amravati
पावसामुळे बाप्पाला घरी नेताना प्लास्टीकचा वापर करण्यात आला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.