मुंबई - कोकणातील गणोशोत्सवसाठी सुरू केलेल्या गणपती विशेष गाड्यांना पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळल्याचे दिसून आले. त्यामुळे आज सुटणाऱ्या या गाड्या रिकाम्या जाणार आहेत.
आज सकाळी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तिकीट आरक्षण सुरू झाले. पहिल्या दिवशी सुटणाऱ्या 4 गाड्यांचे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अवघ्या 1 हजार 48 प्रवाशांनी आरक्षण केले. चार गाड्यांमध्ये एकूण
6552 बर्थ आरक्षित ठेवण्यात आले होते.
जवळपास 5 हजार 504 जागा रिकाम्या आहेत.
गाडी क्रमांक 01105 सीएसएमटी ते सावंतवाडी रोड, गाडी क्रमांक 01101सीएसएमटी ते सावंतवाडी, गाडी क्रमांक 01103
लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ - लोकमान्य टिळक टर्मिनस, गाडी क्रमांक 01107 लोकमान्य टिळक टर्मिनस रत्नागिरी या आज सुटणाऱ्या स्पेशल गाड्यांचा समावेश आहे.
कोकणात गणोशोत्सवासाठी रेल्वे गाड्या सोडण्याबाबत रेल्वे व राज्य शासन यांच्यात निर्णय होत नव्हता. अखेर उशिरा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, तोपर्यंत क्वारंटाइनचा कालावधी पाहता चाकरमानी मोठया संख्येने खासगी वाहनाने कोकणात दाखल झालेत. त्याचा फटका आता रेल्वेला बसणार आहे.