ETV Bharat / state

Elgar Case : एल्गार प्रकरणी सुरेंद्र गडलिंगचा न्यायालयात अर्ज; डिफॉल्ट जामीना अर्जावर युक्तिवाद करण्याची मागितली परवानगी

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात डिफॉल्ट जामीनाकरिता धाव घेतली होती. सुरेंद्र गडलिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात डिफॉल्ट जामीनावर स्वतःच युक्तिवाद करण्याकरिता परवानगी मागितली आहे. सुरेंद्र गडलिंग यांच्या अर्जावर आता दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने डिफॉल्ट जामीन फेटाळल्यानंतर सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

High Court
उच्च न्यायालय
author img

By

Published : Jan 19, 2023, 10:06 AM IST

मुंबई : भीमा गोरेगाव प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी डिफॉल्ट जामीनवर युक्तिवाद करण्यात करिता उच्च न्यायालयाकडून परवानगी मागितली आहे. सुरेंद्र गडलिंग हे स्वतः वकील आहेत. या प्रकरणातील संपूर्ण माहिती त्यांना माहित आहे. त्यामुळे ते त्यांची स्वतःची बाजू भक्कमपणे कोर्टासमोर मांडू शकतील असे अर्जात म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणात दोन आठवड्यानंतर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

जामीन फेटाळण्यात आला होता : सुरेंद्र गडलिंग हे गेल्या चार वर्षांपासून जेलमध्ये आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयातील यांना हे विशेष न्यायालयात डिफॉल्ट जामीन तसेच रेगुलर जामीन विशेष न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. या प्रकरणात सुधा भारद्वाज, वरावरा राव आणि हनी बाबू यांना वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळाला आहे. इतर आरोपींना अद्याप न्यायालयाकडून जामीन मिळालेला नाही आहेत. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कार्यकर्ते रोना विल्सन, नागपूरस्थित वकील सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक शोमा सेन, महेश राऊत, रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे, वकील कार्यकर्ते सुधा भारद्वाज, तेलुगू कवी पी वरवरा राव, कार्यकर्ते अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस आहेत. मृत स्टेन स्वामी, गौतम नवलखा, प्राध्यापक हनी बाबू, सागर गोरखा, रमेश गायचोर, ज्योती जगताप व फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात अटक : सुधा भारद्वाज यांच्यावर शहरी नक्षली असल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी त्यांना भीमा कोरेगाव हिंसाचार एलगार परिषद प्रकरणात 6 जून 2018 ला अटक केली होती . त्यांच्यासह अन्य काही वकील, लेखक आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आले होते. पुणे पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यात उशीर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवरच अनेक प्रश्नं उपस्थित होत होते. पेशव्यांचे मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते.

एल्गार परिषदेतील वक्तव्यं : पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्तव्यं कारणीभूत होती अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदे मागे माओवादी संघटनांचा हात होता असे म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहे. या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली.

हेही वाचा : Bhima Koregaon Case भीमा कोरेगाव प्रकरण आरोपी वकील सुरेंद्र गडलिंगांची डिफॉल्ट जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.