ETV Bharat / state

मुंबईत आजपासून २४४ ठिकाणी मोफत कोरोना चाचणी, येथे संपर्क करा - Additional Municipal Commissioner Suresh Kakani

या सुविधेमुळे महापालिका क्षेत्रात कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची सुविधा ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध झाली असून, मुंबईकरांना कोविड चाचणी अधिक सुलभतेने करण्याचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Nov 1, 2020, 7:08 PM IST

Updated : Nov 2, 2020, 1:22 PM IST

मुंबई - महानगरपालिका क्षेत्रातील कोविड संसर्गावर अधिकाधिक प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य व्हावे, यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने उपाययोजना करीत आहे. याच उपाययोजनांचा भाग म्हणून उद्यापासून म्हणजेच २ नोव्हेंबरपासून महापालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये इत्यादी प्रकारच्या एकूण २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या सुविधेमुळे महापालिका क्षेत्रात कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची सुविधा ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध झाली असून, मुंबईकरांना कोविड चाचणी अधिक सुलभतेने करण्याचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

चाचणी करण्यासाठी याठिकाणी करा संपर्क -

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांमध्ये २४४ ठिकाणी कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या २४४ ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या '१९१६' या क्रमांकाद्वारेही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे http://stopcoronavirus.mcgm.gov.in या स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळावर देखील ही माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे संभाव्य रुग्ण महापालिकेच्या ज्या विभागात रहात असेल, त्याच्या घराजवळ असणाऱ्या ठिकाणांची माहिती ही विभागीय नियंत्रण कक्षांच्या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा '१९१६' या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होणार आहे. तसेच, यासाठी संकेतस्थळाचा पर्याय देखील उपलब्ध आहे. यामुळे मुंबईकरांना आपल्या घरालगतच्या परिसरात कोविड विषयक वैद्यकीय चाचणी आता अधिक सुलभतेने व मोफत करवून घेता येणे शक्य होणार आहे.

'वॉक इन' पद्धतीने चाचणी -

सध्या सुरुवातीला दररोज सकाळी १० ते १२ या कालावधीदरम्यान २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा 'वॉक इन' पद्धतीने उपलब्ध असणार आहे. यापैकी काही ठिकाणी आर.टी.पी.सी.आर. पद्धतीची वैद्यकीय चाचणी, तर उर्वरित ठिकाणी अँटिजेन आधारित वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणार आहे.

खासगी प्रयोगशाळेत चाचणीसाठी शुल्क -

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २४४ ठिकाणांव्यतिरिक्त, महापालिका क्षेत्रातील ५४ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येही या आधीपासूनच कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा सशुल्क स्वरुपात उपलब्ध आहे. यासाठी सुधारित शासकीय दरांनुसार घरी येऊन वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुपये १ हजार ८००, तर वैद्यकीय प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करवून घेण्यासाठी रुपये १ हजार ४०० एवढे शुल्क आहे.

३०० पेक्षा अधिक चाचणी केंद्र -

महापालिकेच्या अखत्यारीतील २४४ ठिकाणे, ५४ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा, या व्यतिरिक्त राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्येही कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणांची एकूण संख्या ही ३०० पेक्षा अधिक झाली असून, मुंबईकरांना कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या करण्याचे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामुळे चाचण्यांची संख्या वाढण्यास मदत होण्यासोबतच वेळेत निदान होण्यासही मदत होणार आहे. परिणामी अधिक प्रभावीपणे कोविड संसर्गाला प्रतिबंध करणेही शक्य होणार आहे, अशी माहिती या निमित्ताने अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

हेही वाचा- विधानपरिषद सदस्यत्व : उर्मिला मातोंडकरच्या नावावरून काँग्रेस-सेनेचा संभ्रम

Last Updated : Nov 2, 2020, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.