ETV Bharat / state

Police Recruitment In Mumbai : पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी 31 जानेवारीपासून; ट्रान्सजेंडरचा अल्प प्रतिसाद

मुंबई पोलीस दलातील 8 हजार 70 पदांसाठी पोलीस भरती (police recruitment in mumbai) घेण्यात येत आहे. भरतीसाठी जवळपास सात लाख उमेदवारांचे अर्ज (Application for Police Recruitment) प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ 24 जणांचे अर्ज हे ट्रांसजेंडर कॅटेगरीतील (application of transgender category) असल्याची माहिती मिळत आहे. कालपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचण्या (Physical Test for Police Recruitment) सुरू झाल्या आहेत. मुंबई पोलीस दलातील पोलीस भरतीसाठी मागवलेल्या अर्जांप्रति अर्जदाराची शारीरिक चाचणी 31 जानेवारीपासून प्राथमिक स्तरावर दादर येथील नायगाव पोलीस ग्राउंड आणि अंधेरीतील मरोळ येथे होणार असल्याची माहिती मुख्यालय 2च्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. (Latest news from Mumbai)

Police Recruitment In Mumbai
पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी
author img

By

Published : Jan 3, 2023, 7:19 PM IST

मुंबई : ही शारीरिक चाचणी (Physical Test for Police Recruitment) मुंबईत जवळपास सहा महिने चालू राहणार असल्याची माहिती देखील सातपुते यांनी दिली. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस दलात काम करण्यासाठी ट्रान्सजेंडर व्यक्तींना (application of transgender category) देखील मोठी संधी निर्माण झाली. (police recruitment in mumbai) मात्र, अद्याप शारीरिक चाचणी बाबत नियम आणि निकष ठरलेले नसून राज्य सरकारकडून जेव्हा हे निकष प्राप्त होणार तेव्हा त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाईल, पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. (Latest news from Mumbai)

14 हजार जागांसाठी भरती : राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रखडून असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 14 हजार जागांसाठी भरती केली जाणार आहे.

अशी असेल शारीरिक चाचणी : पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.