ETV Bharat / state

UGC exam: यूजीसीच्या 57 विषयांच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान होणार

देशभर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षणा संदर्भातील राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यानुसार देशभर विविध ठिकाणी परीक्षा होतात. या संदर्भातील परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्यास संदर्भातील वेळापत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच जारी केले आहे.

author img

By

Published : Feb 13, 2023, 1:16 PM IST

UGC examination will be held
10 मार्च यूजीसी परीक्षा

मुंबई: नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट सहाय्यक प्राध्यापक म्हणून भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांची योग्यता निश्चित करण्यासाठी 21 फेब्रुवारी ते 10 मार्च 2023 या कालावधीत आयोजित केली जाईल, अशी घोषणा युजीसीने केली. ही परीक्षा 57 विषयांची संगणक आधारित चाचणी असेल. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, UGC ने NTA ला UGC-NET आयोजित करण्याची जबाबदारी सोपवली आहे. ही चाचणी भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.

वेळापत्रक जाहिर: देशभर लाखो विद्यार्थी युजीसीच्या नेट परीक्षेसाठी अर्ज करतात आणि मेहनत करून ही परीक्षा देत असतात. डिसेंबर 2022 मध्ये ज्यांनी या संदर्भातील अर्ज केलेला आहे. त्या संदर्भातील पहिल्या टप्पासाठी एकूण 57 विषयांसाठी या परीक्षा घेतल्या जाणार आहे. या परीक्षा यावर्षीच्या म्हणजेच फेब्रुवारी 21 व 22 आणि 23 तसेच 24 फेब्रुवारी 2023 या काळामध्ये होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना ही जारी केली आहे. तसेच याबाबतचं शहरांसाठीच परीक्षा केंद्र कुठे असणार यांचे संपूर्ण वेळापत्रकासाठी उमेदवारांनी यूजीसी नेट या संकेतस्थळावर किंवा एनटीए च्या संकेतस्थळावर जाऊन याबाबतची अधिकृत माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे कोणत्या शहरांसाठी कुठे केव्हा परीक्षेचे वेळापत्रक नेमक काय आहे. त्याची नेमकी विश्वासार्ह माहिती प्रत्येक उमेदवाराला प्राप्त होऊ शकेल.

प्रवेश पत्र डाउनलोड करा: यासंदर्भातील आपल्या शहरातील परीक्षा केंद्राबाबत प्रवेश पत्र हे आपण यूजीसी नेट या संकेतस्थळावर पाहू शकता. www.ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळावर क्लिक करून संपूर्ण तपशील भरा. मग आपण तो डाऊनलोड करू शकतात. यासाठी प्रत्येक उमेदवाराला आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख तिथे नोंदवावी लागेल त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल आणि मग आपण आपलं प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.

आपलिकेशन डाऊनलोड करा: विद्यापीठ अनुदाने यावेळी विशेष संदेश आपलिकेशन देखील जारी केलेले आहे. उमेदवारांनी ज्यांना यूजीसी नेट 2022 मध्ये अर्ज केलेला आहे. त्यांनी संदेश एप्लीकेशन वर आपले अद्ययावत माहिती तपासावी. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जावे. त्यानंतर तिथे संदेश ॲप असे टाईप करावे आणि त्यानंतर आपल्याला विद्यापीठ अनुदान आयोगाचे SANDESH संदेश एप्लिकेशन दिसेल ते इन्स्टॉल करा. डाऊनलोड करा आणि त्यामध्ये आपली माहिती नमूद करून अद्यावत परीक्षेबाबतची माहिती जाणून घ्या. सर्व उमेदवारांसाठी परीक्षेकरता उपयोगात येणारे प्रवेश पत्र पुढील काही दिवसात राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएकडून जारी केले जाणार आहे.

हेही वाचा: TET Exam 2023 एकाच वेळी चारचार परीक्षा देणे अशक्य महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षांचे नियोजन बदलणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.