मुंबई - केरळमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात वैमानिक असणारे महाराष्ट्राचे सुपुत्र दिपक साठे यांचा मृत्यू झाला. एअर इंडीयात जॉईन करण्याआधी हवाई दलात ते लढाऊ वैमानिक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्त झाल्यावर एअर इंडियात ते रुजू झाले. त्यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या मित्रपरिवाराला धक्का बसला आहे. दीपक साठे यांच्या आठवणी त्यांच्या मित्र परिवाराने ईटीव्ही भारतकडे जागवल्या.
कॅप्टन दीपक साठे हे उत्कृष्ट पायलट होते. ते अतिशय मनमिळावू होते. ते एक मेहनती पायलट होते. एअरफोर्सनंतर ते एअर इंडियामध्ये कार्यरत होते. यंत्रणेतील बारकावे त्यांना माहीत होते. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. काही वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता मात्र, त्यातून ते सावरले होते, असे सेवानिवृत्त विंग कमांडर कमलदीप यांनी सांगितले. माझे नातेवाईक इथे राहतात. जेव्हा मी इथे यायचो. तेव्हा ते मला भेटायचे. ते मनमिळावू स्वभावाचे असल्याचे शरद जोशी यांनी सांगितले.