मुंबई - कोरोनाच्या या संकटात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यात आता म्यूकरमायकोसिस आजाराची भर पडली आहे. अनेक लोकांच्या अगदी नातेवाईकाचा, मित्रपरिवारातील एखाद्याचा मृत्यू होत आहे. अनेक लोकांकडे उपचारासाठी पैसेच नाही आहेत. अशा परिस्थितीत अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. मात्र, मदत मिळाल्यानंतर औषधी मिळत नसल्याची उदाहरणे समोर येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक भाईदास माळी यांना हाच अनुभव येत आहे.
मित्रपरिवाराने केली मदत -
भाईदास माळी यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली. कोरोनामुक्त झाल्यावर त्यांना म्यूकरमायकोसिसची लागण झाली. या आजारावरील उपचारासाठी भाईदास माळी यांना मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या उपचारावरील तब्बल 40 लाख रुपये होता. उपचाराचा खर्च ऐकून कुटुंबीय हतबल झाले. अशा वेळेस त्यांच्या मित्रपरिवाराने मदतीचे हात पुढे केले.
हेही वाचा - म्यूकरमायकोसिस रूग्णांवर होणार मोफत उपचार, राज्य सरकारने कंबर कसली
भाईदास माळी यांच्या उपचारासाठी 40 लाखाची गरज आहे, हे समजताच त्यांच्या बॅच क्रमांक 113 यातील सर्व सदस्यांनी कॅम्पेनिंग सुरू केले. बॅचच्या सगळ्या सातशे सदस्यांनी तब्बल 30 लाख रुपये फंडिंग जमा केले. भाईदास माळी हे बुलढाणा इथे कर्तव्यावर आहेत. तेथल्या त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पैसे जमा केली. त्यांच्या या मित्रपरिवारातील 730 जणांमुळे उपचाराचा डोंगराएवढा वाटणारा खर्च राईइतका झाला. मात्र, पैसे जमा झाल्यानंतर आता औषधांची समस्या निर्माण झाली आहे.
हेही वाचा - 'ई टीव्ही भारत'चे वृत्त ठरले खरे! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे केले होते भाकित
औषधीची समस्या -
सध्या भाईदास माळी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. यादरम्यान त्यांना औषधांची सर्वात जास्त ज्याची गरज आहे. म्यूकरमायकोसिससाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा अपूर्ण आहे. औषधी मिळत नसल्याने भाईदास यांचे कुटुंबीय चिंतेत आहे.