मुंबई : व्हीजेटीआय माटुंगा येथे इस्त्रोचे प्रदर्शन हा कार्यक्रम सर्व वयोगटांसाठी मोफत आणि खुला आहे. विविध प्रक्षेपण वाहने आणि उपग्रह, एक ह्युमनॉइड रोबोट, एक स्मार्ट स्पेस रोबोट, स्पेस सेन्सर्स आणि अॅक्ट्यूएटर्सचे प्रदर्शन करतील. इस्रोच्या प्रदर्शनातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानातील प्रगतीबद्दल जाणून घेण्याच्या आणि विश्वातील ज्या घडामोडी आहेत, त्याबाबत समजून घेण्याची प्रेरणा शालेय वयात निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांना याबाबतीत मार्गदर्शन मिळावे, ह्या उद्देशाने हे प्रदर्शन सुरू आहे.
'याची' दिली जाणार माहिती : 24 फेब्रुवारीपासून इस्त्रोच्या 3 दिवसीय प्रदर्शनात प्रक्षेपण वाहने, उपग्रह प्रदर्शनात असतील. हा कार्यक्रम सर्व वयोगटांसाठी विनामूल्य खुला आहे. विविध प्रक्षेपण वाहने आणि उपग्रह प्रदर्शित करतील. अंतराळ तंत्रज्ञानातील प्रगती जाणून घेण्याची आणि विश्वातील आश्चर्ये जाणून घेण्याची संधी यामुळे मिळते. या प्रदर्शनात स्पेस एजन्सीचे वरिष्ठ अभियंते आणि शास्त्रज्ञ असतील, जे अभ्यागतांशी संवाद साधतील आणि त्यांचे अनुभव आणि ज्ञान एकमेकांना देतील.
तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल अंतर्दृष्टी : यात संवादात्मक सत्र असणार आहे. त्यात इस्रोच्या कार्यप्रणालीबद्दल आणि अंतराळ संशोधन कसे करतात? त्याची माहिती मिळविण्याची एक अनोखी संधी शालेय विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होईल. तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल अंतर्दृष्टी काय असावी? तंत्रज्ञान आणि नवकल्पनेला वाव कसा द्यावा? विद्यार्थ्यांना नवकल्पना असतील तर त्या कश्या साकाराव्यात? संस्थेमध्ये कसे सामील व्हावे? याबद्दल इस्रो मार्गदर्शन देखील करेल.
विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला जागे करण्याचा प्रयत्न : यासंदर्भात वीर जिजामाता इन्स्टिट्यूट मधील शास्त्रज्ञ प्रशांत भावे यांनी ईटीवी भारतसोबत संवाद साधताना सांगितले की, विशेष करून इस्रोसारख्या अग्रगण्य संस्था जनसामान्यांमध्ये त्याविषयी एक आकर्षण आहे. परंतु त्या संस्थेमध्ये जाणे. त्या ठिकाणी जाऊन अनेक गोष्टी पाहणे, करणे हे कठीण असते. त्यामुळेच तंत्रज्ञानात क्षेत्रातील वीर जिजामाता इन्स्टिट्यूट या ठिकाणी त्यांनी हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. यामध्ये रोबोटिक्स संदर्भात इकोसिस्टीम काय आहे? ती कशी आहे? बदलत्या भारतामध्ये रोबोटिक्स काय योगदान देऊ शकतो? यासारख्या बाबी विद्यार्थ्यांना जवळून समजून घेता येईल. त्याद्वारे त्यांच्या मनामध्ये कुतूहल जागे होईल, ज्यांना याबाबत काही करायचे ते पुढे या रीतीने आपले अभ्यास प्रशिक्षण करतील.
प्रत्यक्ष वैज्ञानिकांसोबत होणार संवाद : विद्यार्थ्यांना खास या ठिकाणी शास्त्रज्ञ आणि तज्ञ जाणकार व्यक्तींसोबत आदान प्रदान करता येईल. ते आपल्या मनातील प्रश्न विचारू शकतील, हे यंत्र कसे तयार झाले? त्या पाठीमागचे प्रेरणा काय? त्यामागे असलेले वैज्ञानिक तत्वे कोणती? अशा अनेक बाबी त्या त्यांना समजू शकतील. विद्यार्थी शाळेमध्ये किंवा महाविद्यालयात शिकताना त्यांना अनेक वैज्ञानिक मूलभूत नियम समजून घ्यावे लागतात. ते समजून घेण्यासाठी त्यांना तसे वातावरण देखील उपलब्ध असावे लागते. या प्रदर्शनातून ते वातावरण आणि त्याबद्दलची प्रेरणा जागी करण्याचे काम हे प्रदर्शन करणार आहे.
आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. तसेच आजचा अखेरचा दिवस जरी असला तरी हजारो विद्यार्थी या ठिकाणी भेट देतील, असे व्हीजेटीआय ज्येष्ठ प्राध्यापक आणि वैज्ञानिक प्रशांत भावे यांनी सांगितले.