ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'मोफत' उपचार; कुर्ल्यात 'वन रुपी क्लिनिक' उपक्रम

author img

By

Published : Apr 4, 2020, 4:52 PM IST

गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईतील गल्ली-बोळात जाऊन वनरुपीचे डॉक्टर नागरिकांची तपासणी करत आहेत. काही आजार असल्यास उपचार करत आहेत. तर कुलाबा येथेही त्यांनी दोन महिन्यांसाठी वनरुपी क्लिनिक सुरू केले आहे.

free of cost treatment in kurla regarding corona symptoms
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'मोफत' उपचार; कुर्ल्यात 'वन रुपी क्लिनिक' उपक्रम

मुंबई - कोरोनाच्या भीतीने काही खासगी डॉक्टरांनी तर काहींनी सुरक्षेची साधने नसल्याचे म्हणत दवाखाने-क्लिनिक बंद ठेवली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी आता 'वन रुपी क्लिनिक' हा उपक्रम पुढे आला आहे.

कुर्ला रेल्वे स्थानक येथील तिकीट खिडकीच्या बाहेर सोमवारपासून वन रुपी क्लिनिक सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे 24 तास ओपीडी सेवा दिली जाणार असून ही सेवा मोफत असणार आहे. केवळ एक रुपया शुल्क आकारत वनरुपी क्लिनिक रुग्णांची तपासणी करतात. त्यामुळे ही सेवा मुंबईत सुरू झाल्यापासून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. अशात आता आपत्कालीन परिस्थितीत ही वन रुपी क्लिनिक नागरिकांच्या मदतीला धावून आले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईतील गल्ली-बोळात जाऊन वन रुपीचे डॉक्टर नागरिकांची तपासणी करत आहेत. काही आजार असल्यास उपचार करत आहेत. तर कुलाबा येथेही त्यांनी दोन महिन्यांसाठी वनरुपी क्लिनिक सुरू केले आहे. आता कुर्ला येथे कायमस्वरूपी वन रुपी क्लिनिक सुरू केले जात आहे.

वन रुपी क्लिनिकमध्ये कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांची तपासणी केली जाणार असून ही सेवा 24 तास असेल. यासाठी सध्या 1 रुपयाही आकारला जाणार नसल्याचे वनरुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी सांगितले आहे. लॉकडाऊनच्या काळात ही सेवा सुरू झाल्याने कुर्लावासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.