ETV Bharat / state

वाहन कर्जाच्या नावाखाली बँकेला १ कोटी ६५ लाखांना लावला चुना - मुंबईत वाहन कर्जाच्या नावाखाली बँकेला 1 कोटी 65 लाख रुपयांचा चुना

आयडीबीआय बँक लोअर परळ शाखेच्या तक्रारीवरुन एन एम जोशी मार्ग पोलिस ठाण्यांमध्ये १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात दरम्यान १३ वाहन कर्जांची कागदपत्र ही बनावट असून अंधेरीतील वर्सोवा येथील एका बँकेच्या खात्यामध्ये सदरचे वाहन कर्ज वळविण्यात आले होते. जे बँकेचा एजंट संतोष कांबळे याच्याकडून हाताळले जात असल्याचा पोलिसांचा म्हणणे आहे.

Fraud of Rs 1 crore 65 lakh name of auto loan in mumbai
मुंबईत वाहन कर्जाच्या नावावर बँकेला चुना
author img

By

Published : Jun 4, 2021, 12:44 PM IST

मुंबई - येथील लोअर परळ परिसरातील आयडीबीआय बँकेच्या शाखेमध्ये वाहन कर्जाच्या नावाखाली 1 कोटी 65 लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये १३ वाहनांवर बनावट नावांच्या आधारावर कर्ज घेतले होते. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्याविरोधात मुंबई एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

डीलर, कागदपत्रे, चलन, आरसी बुकही बनावट -

मुंबईतील लोअर परळ येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेमध्ये संतोष कांबळे नावाचा एजंट हा गेल्या दोन वर्षापासून वाहन कर्जांच्या संदर्भात काम करत होता. या शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या ओळखीच्या असलेल्या संतोष कांबळे याने बनावट आरसी बुक, बनावट चलन व बनावट वाहनांच्या कागदपत्रांवर बँकेमध्ये गेल्या दोन वर्षात १३ वाहन कर्जाचे कागदपत्र जमा केले होते. कल्याणमधील एका शो रूम डीलरचा पत्ताही यासाठी दिलेला होता. गेल्या काही महिन्यांपासून या शाखेतून मंजूर झालेल्या १३ वाहन कर्जाचे हप्ते थकल्यामुळे याची चौकशी करण्यात आली. तर कल्याणमधील वाहन डीलर हा बनावट असल्याचे समोर आले. यासंदर्भात एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गुन्हा दाखल पण अद्याप कुणालाही अटक नाही -

आयडीबीआय बँक लोअर परळ शाखेच्या तक्रारीवरुन एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यांमध्ये १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात दरम्यान १३ वाहन कर्जांची कागदपत्र ही बनावट असून अंधेरीतील वर्सोवा येथील एका बँकेच्या खात्यामध्ये सदरचे वाहन कर्ज वळविण्यात आले होते. जे बँकेचा एजंट संतोष कांबळे याच्याकडून हाताळले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वाहन कर्ज घेणारे हे १५ जण सध्या अस्तित्वात आहेत की नाही याची चौकशी पोलीस करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असला तरी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा - पैशाच्या पावसाची वाट पाहत राहिला, मांत्रिकाकडून लागला 53 लाखांचा चुना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.