ETV Bharat / state

Cheated By Instagram : इंस्टाग्रामद्वारे क्रिप्टोत पैसे गुंतविल्यास अर्ध्या तासात दुप्पट देतो सांगून फसवले - through Instagram

काळाचौकी पोलिसांनी इंस्टाग्रामवर फेक अकाउंटवर क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतविल्यास अर्ध्या तासात दुप्पट करून देतो अशी जाहिरात देऊन लोकांना गंडा घालणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हमजा झाकी अन्वर, वय 21 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.(Cheated By Instagram)

Cheated By Instagram
क्रिप्टोच्या नावाने फसवले
author img

By

Published : Jul 15, 2023, 3:02 PM IST

मुंबई : इंस्टाग्रामवर क्रिप्टो अनैशा या नावाने अकाउंट तयार करून क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतविल्यास ते ३० ते ३५ मिनिटांमध्ये डबल करून देतो अशी जाहिरात करत, लोकांना ऑनलाइन पद्धतीने पैसे गुंतवण्यास सांगत त्यांना आमीष दाखवण्यात आले, या प्रकारात अनेकांची आर्थिक फसवणूक झाली. या प्रकरणात काळचौकी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 419, 420, सह 66(c) 66(d )माहिती तंत्रज्ञान कायदा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशी काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद भोवते यांनी दिली.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुदर्शन चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता. चव्हाण आणि त्यांच्या पथकाने जलद गतीने तपास करून आरोपीला कोलकत्ता ,पश्चिम बंगाल येथून अटक केली. मोहम्मद हमजा झाकी अन्वर, वय 21 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 23 जून 2022 रोजी क्रिप्टो अनेषा या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट चालकाने तक्रारदारांना क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास त्यांचे पैसे ३० ते ३५ मिनिटात डबल करून मिळेल असे सांगत तक्रारदारांची 75 हजार रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सुदर्शन चव्हाण, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम तुपे व पथक यांनी सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करून ते इंस्टाग्राम अकाउंट एका जीओ मोबाईल धारकाने बनविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या मोबाईल क्रमांकाच्या आधारावरहे हे सिम कार्ड मोहम्मद हमजा झाकी अन्वर याच्या नावाने कोलकातातील पत्त्यावर रजिस्टर असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक तुपे व पथकाने कोलकता येथे जाऊन आरोपीच्या राहत्या पत्त्यावर पाळत ठेवून तो त्याच्या घरी असल्याची खात्री होताच त्यास ताब्यात घेऊन स्थानिक इकबालपुर पोलीस ठाणे येथे आणत तपास केला तेव्हा त्यानेच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या कडून काळ्या रंगाचा वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे.

हेही वाचा

  1. Tamilnadu Truck Driver Drags Toll official : पुणे सातारा महामार्गावर जीवघेणा थरार, तामिळनाडूच्या ट्रक चालकाने कर्मचाऱ्याला नेले फरफटत
  2. Buldhana Crime News : आधी बलात्काराचा गुन्हा दाखल, आता पीडिता म्हणते 'तसे काही झालेच नाही'
  3. Rape Case: चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेपेची शिक्षा; पीडितेच्या आईने न्यायालयासमोर केली पतीच्या सुटकेची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.