मुंबई : या प्रकरणी विधी संघर्ष बालकासह पियुश रमेश सोनी, 35 वर्षे, राठि कुशवाल फार्म हाऊस रोड, विजयनगर, अजमेर राजस्थान, अर्जुन महेश सोनी, 29 वर्षे, राठि सदर बाझार टाटोटी, अजमेर, राजस्थान, राजकुमार बाबुलाल सोनी, 32 वर्षे, राठि- बजरंग कॉलोनी, सटाणा बाझार, अजमेर, राजस्थान या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
6 ते 18 तारखे दरम्यान गुन्हा : तक्रारदार यांचे नाव महालक्ष्मी रामस्वामी अय्यर, वय 58 वर्षे असून त्या गृहिणी आहेत. तक्रारदार महालक्ष्मी अय्यर यांना 6 मार्च ते 18 मार्चच्या दरम्यान त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्स् अप वर Global Advert Corp Official या कंपनीच्या नावे पार्टटाईम जॉबसाठी संदेश प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांनी Global Advert Corp Official या कंपनीच्या नावे असलेला टेलेग्राम ग्रुप जॉईन केला. नमुद टेलेग्राम ग्रुप वर त्यांना युट्युब लिंक ओपन करुन नमुद विडिओ लाईक करण्याचा जॉब-टास्क देण्यात आला. नमुद जॉब टास्क केल्यानंतर त्यांचे बँक खात्यात सुरवातीला 150/- रुपये जमा झाले. त्यानंतर 1300/- रुपये, त्यानंतर 7500/- रुपये असे पैसे टास्क पुर्ण केल्यावर त्यांच्या बँक खात्यावर जमा करुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदाराना मोठा टास्क देवुन 12000/-, 25000/-, 50000/- अशा मोठ्या रक्कमा भरावयास लावुन जास्त पैसे कमवण्याचे आमिष देण्यात आले. नमुद आमिषाला बळी पडुन तक्रारदारांनी एकुण 4,32,100/- रुपये भरले परंतु त्यांना कोणतीही रक्कम परत मिळाली नाही. अश्याप्रकारे तक्रारदारांना टेलेग्राम ग्रुप टास्क फ्रॉड मध्ये 4 लाख 32 हजार 100/- रुपये भरण्यास लावुन त्यांची फसवणुक झाल्याने नमुद कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्ह्याचा तपास चुनाभट्टी पोलीस ठाणेच्या सायबर पथकाने केला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले IDFC बँक खाते क्रमांक 10125994665 DK ग्रुप व YES बँकेचे खाते क्रमांक 042252000004997 शिवशंकर पासवान यांचे नावे असल्याचे निष्पन्न झाले होते. या खात्यांबाबत सातत्याने सखोल तपास केला असता नमुद आरोपीतांनी त्यांच्या व त्यांच्या साथीदारांच्या नावे वेगवेगळ्या ऑफीस पत्यांवर वेगवेगळ्या कंपनीच्या नावे वेगवेगळ्या बँकांमध्ये अनेक करंट अकाऊंट उघडल्याचे निष्पन्न झाले होते. नमुद कंपनींच्या ऑफीस मालकांकडे तसेच बँक कर्मचाऱ्यांकडे कौशल्यपुर्ण तपास करुन नमुद करंट अकाऊंट उघडणारा खरा सुत्रधार अल्पवयीन मुलगा हा असल्याची माहिती प्राप्त करण्यात आली. हा आरोपी सातत्याने त्याचा मोबाईल क्रमांक बदलत असल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते.
97 लाख रुपयांची रक्कम गोठावली : नमुद आरोपीतांना मा महानगर दंडाधिकारी 60 वे न्यायालय, मुंबई यांनी 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असुन विधिसंघर्षग्रस्त बालकास दिनांक 3 मे पर्यंत बालगृह येथे ठेवण्याचे बाल न्यायालयाने आदेशीत केले आहे. तसेच नमुद गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आरोपीतांनी वापरलेले बँक खाते व त्यांनी इतर गुन्ह्यासाठी अशाच प्रकारे बनवलेले इतर बँक खाते असे एकुण 24 बँक खात्यात अद्याप पर्यंत 97 लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. अटक आरोपिंविरोधात सायबर पोलीस ठाणे बी के सी.,पंतनगर पोलीस ठाणे, माटुंगा पोलीस ठाणे व इतर राज्यात गुन्हे दाखल झाले असल्याची प्राथमीक माहिती प्राप्त झाली आहे.