ETV Bharat / state

मुंबईत अवतरले फाउंटन पेनचे युग; प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

मुंबईत 'केअर स्टेशनर्स अँन्ड एजन्सीज् प्रा.लि.'तर्फे 'छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय' येथे १६ डिसेंबरला शाई पेनचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनात १०० रुपयांपासून ते ३ लाखापर्यंतचे पेन विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाला लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

foundation pen exhibition
शाई पेनचे प्रदर्शन
author img

By

Published : Dec 19, 2019, 8:13 AM IST

मुंबई - तंत्रज्ञानाच्या युगात पेनचा वापर कमी होत आहे. त्यातच शाईपेनचा वापर तर किंचितच होताना दिसतो. नव्या पिढीला शाईपेनची ओळख व्हावी आणि या पेनचा वापर पुन्हा एकदा व्हावा, या उद्देशाने 'केअर स्टेशनर्स अँन्ड एजन्सीज् प्रा.लि.'तर्फे 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय' येथे १६ डिसेंबरला शाई पेनचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

शाई पेनचे प्रदर्शन

शाई पेनचे प्रदर्शन बघायला आलेल्या मध्यम वयातील व्यक्तींना त्यांचे लहानपण आठवत, पुन्हा एकदा हा पेन वापरण्याची ईच्छा होत असल्याची प्रतिक्रिया अनेकजणांनी दिली. प्रदर्शनात १०० रुपयांपासून ते ३ लाखापर्यंतचे पेन विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

या प्रदर्शनात इंग्रजांच्या काळातील व्हिंटेज पेन तसेच आकर्षक नक्षीकाम केलेले आणि विविध रंगातील पेन सर्व वयोगटातील नागरिकांना आकर्षित करत होते. तर, गणपतीचे कोरीव काम केलेला ४० हजारांचा पेन सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शाई-पेनाचे विश्‍व उलगडले आहे. आत्तापर्यंत आपण हजार रूपयापर्यंतचे पेन बघितले होते. मात्र, इतकी महागडी पेन्स पाहून डोळ्यावर विश्वासच बसत नसल्याचे प्रदर्शन बघायला आलेल्या शिक्षकाने सांगितले.

हेही वाचा - आर्थर रोड कारागृहाची सुरक्षा रामभरोसे; अनेक सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त

पुण्यानंतर हे प्रदर्शन मुंबईत भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन विशेषकरून शाईपेन प्रेमींसाठी घेण्यात आले होते. सुंदर अक्षरांसाठी शाईपेन महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाईपेनचे महत्व रुजावे, जास्तीत जास्त शाई पेनाचा वापर व्हावा, एकाच ठिकाणी १३ देशातील ४० हून अधिक ब्रांन्ड्स सर्वसामान्यांना बघता यावे. तसेच, शाईपेन प्रेमींना त्यांच्या संचयात भर घालता यावी या उद्देशातून हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. भारतातील ६ वेगवेगळ्या पेन कंपनीदेखील या प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. नुकतेच आमच्या संस्थेने पुण्यामध्ये हे प्रदर्शन आयोजित केले होते. स्मार्ट फोनच्या युगात एकीकडे शाई पेन वापरणे कमी झाले आहे. हे पुन्हा वाढावे यासाठी आम्ही या प्रदर्शनातून प्रयत्न करत आहोत, असे आयोजक नगरकर यांनी यावेळी सांगितले.

प्रदर्शनात ठेवण्यात आलेले विविध देशांचे शाई पेन
जपान - सायलोर, पायलट, प्लॅटिनम, अमेरिका - व्हल एव्हरशार्प, पार्कर, क्रॉस, तैवान - ट्विसबी, लेबन, जर्मनी - ऑनलाइन, स्लेओ स्क्रिबेंट, ओट्टो हट, डिप्लोमॅट, फेबर कॅस्टल, ग्राफ वोन, वॅल्डमॅन, तुर्की - स्क्राइक्स, ब्रिटन - प्लॅटिनम, फ्रान्स - वॉटरमॅन, भारत - लोटस, रायटॉल, मग्नाकार्टा, सबमॅरिन, एअरमेल, व्हिंटेज, इटली - स्टिपुला, रशिया - बेनू, ऑस्ट्रेलिया - रॉबर्ट ऑस्टर

हेही वाचा - 'चिखल करा आणि कमळ फुलवा असे आता चालणार नाही'

Intro:मुंबई । तंत्रज्ञानाच्या युगात पेनाचा वापर कमी होत आहे. त्यातच शाईपेनाचा वापर तर किंचित होताना दिसत आहे. नव्या पिढीला शाईपेनाची ओळख व्हावी आणि या पेनांचा वापर पुन्हा एकदा व्हावा, या उद्देशाने केअर स्टेशनर्स अँन्ड एजन्सीज् प्रा.लि. तर्फे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय येथे शाई पेनाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. 16 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सकाळी 11 रात्री 8 पर्यंत सुरू असणार आहे. हे प्रदर्शन बघायला येणाऱ्या मध्यम वयातील व्यक्तींना त्याचं लहानपण आठवत पुन्हा एकदा हा पेन वापरण्याची ईच्छा होत आहे, अशा प्रतिक्रिया येथे आलेले अनेकजण देत आहेत. प्रदर्शनात रुपये 100 ते 3 लाखापर्यत पेन विकण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. Body:इंग्रजांच्या काळातील व्हिंटेज पेन तसेच आकर्षक नक्षीकाम केलेले आणि विविध रंगातील पेन सर्व वयोगटातील नागरीकांना आकर्षित करत आहेत. गणपतीचे कोरीव काम केलेला 40 हजारांचा पेन सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून शाई-पेनाचे विश्‍व उलगडले आहे. आता पर्यत हजार रूपयापर्यत पेन पाहिले होते मात्र इतकी महागडी पेन्स पाहून डोळ्यावर विश्वास बसत नाही, असे एका प्रदर्शन बघायला आलेल्या शिक्षकाने सांगितले.

पुण्यानंतर हे प्रदर्शन मुंबईत भरवण्यात आले आहे. शाईपेन प्रेमींसाठी ते घेण्यात आले आहे. सूंदर अक्षरासाठी शाईपेन महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाईपेनाचे महत्व रूजावे, जास्तीत जास्त शाई पेनाचा वापर व्हावा. एकाचं ठिकाणी 13 देशातील 40 हून अधिक ब्रांन्ड्स सर्वसामान्यांना बघता यावे, तसेच शाईपेन प्रेमींना त्यांच्या संचयात भर घालता यावी हा या प्रदर्शनामागील हेतू आहे. तसेच भारतातील 6 वेगवेगळ्या पेन कंपनीदेखील या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. नुकतेच आमच्या संस्थेने पुण्यामध्ये हे प्रदर्शन आयोजीत केले होते. स्मार्ट फोनच्या युगात एकीकडे शाई पेन वापरणे कमी झाले आहे. हे पुन्हा वाढावे यासाठी आम्ही या प्रदर्शनातून प्रयत्न करत आहोत, असे आयोजक नगरकर यांनी सांगितले.

विविध देशांचे शाई पेन

- जपान : सायलोर, पायलट, प्लॅटिनम

- अमेरिका : व्हल एव्हरशार्प, पार्कर, क्रॉस

- तैवान : ट्विसबी, लेबन

- जर्मनी : ऑनलाइन, स्लेओ स्क्रिबेंट, ओट्टो हट, डिप्लोमॅट, फेबर कॅस्टल, ग्राफ वोन, वॅल्डमॅन

- तुर्की : स्क्राइक्स

- ब्रिटन : प्लॅटिनम

- फ्रान्स : वॉटरमॅन

- भारत : लोटस, रायटॉल, मग्नाकार्टा, सबमॅरिन, एअरमेल, व्हिंटेज

- इटली : स्टिपुला

- रशिया : बेनू

- ऑस्ट्रेलिया : रॉबर्ट ऑस्टरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.