मुंबई - जगभरात गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूचा प्रसार ( Corona Virus Infection ) पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे. या चाचणीत ( Corona Virus Test ) एकूण ९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी २ प्रवाशांना कोरोनाच्या ( Corona Patient In Mumbai ) ओमीक्रॉन बी १.१ व्हेरीयंटची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने ( Mumbai Municipal Corporation ) दिली आहे.
९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह चीन, जापान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राजील आणि फ्रान्स आदी देशांमध्ये कोविड - १९ च्या रुग्ण संख्येत अचानक झालेली वाढ पाहता भारत सरकारने अद्ययावत सूचना प्रसारित केलेल्या आहेत. त्यानुसार या देशातून आलेल्या पैकी २ टक्के रुग्णांची चाचणी ( Corona Virus Test ) केली जात होती. त्यानंतर आता विमानतळावर आलेल्या सर्वच प्रवाशांची चाचणी केली जात आहे. या चाचणी दरम्यान आतापर्यंत एकूण ९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
२ प्रवाशांना ओमायक्रोन बी १.१ ची लागण या पॉझिटिव्ह प्रवाशांचे नमुने पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवले होते. ९ पैकी २ प्रवाशांचे अहवाल आले असून त्यामधील २ जणांना कोरोनाच्या ओमीक्रॉन बी १.१ व्हेरीयंटची लागण झाल्याचे समोर आले आहे. इतर ७ जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. कोरोनाच्या ओमायक्रोन बी १.१ व्हेरीयंटची लागण झालेल्या २ प्रवाशांपैकी एक पुरुष तर एक महिला प्रवासी आहे. १६ वर्षाचा तरुण प्रवासी २६ डिसेंबर २०२२ रोजी लंडन येथून आला होता. तसेच २५ वर्षीय महिला २८ डिसेंबरला स्विझरलंड येथून आली होती. ती नवी मुंबई येथील रहिवासी असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
पॉझिटिव्ह प्रवाशांना केले जाते क्वारंटाईन मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी ( Corona test ) केली जात आहे. या चाचणीत पॉझीटिव्ह आढळून येणाऱ्या तसेच मुंबई शहरात पॉझीटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांचे नमुने पुण्याच्या एनआयव्ही येथे पाठवले जात आहेत. विमानतळावर आढळून येणाऱ्या पॉझिटिव्ह प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे. या प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर किंवा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यावर डिस्चार्ज दिला जात आहे. तसेच पॉझीटिव्ह आढळून आलेल्या प्रवासी आणि नागरिकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेवून त्यांची तपासणी केली जात असल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.