मुंबई : शिवसेना नेते संजय राऊतांच्या पाठोपाठ आता ठाकरे गटातील आणखी एका नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या एसआरए ( Mumbai Mayor leader Kishori Pednekar ) घोटाला प्रकरणी चौकशीसाठी पोलीस ( Kishori Pednekar arrives at Dadar Police Station ) स्टेशनला दाखल ( SRA flats scam ) झाल्या आहेत.
काय आहे आरोप? मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि दादर एसआरए घोटाळ्याचे आरोपी चंद्रकांत चव्हाण हे सख्खे शेजारी आहेत. दोघेही गोमाता जनता एसआरए सोसायटी लोअर परळ वरळी येथे राहतात.
किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक शपथपत्रात राहण्याचे ठिकाण गोमाता जनता एसआरए दाखविले होते. चंद्रकांत चव्हाण यांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात झालेल्या एफआयआरमध्ये चव्हाण यांचा पत्ता गोमाता जनता एसआरए दाखविले आहे.
चौघांवर अटकेची कारवाई? दादर पोलीस ठाण्यात एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भात चौघांवर अटकेची कारवाई झालेली आहे. या प्रकरणी चौकशी होत असताना पेडणेकरांचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशीसाठी त्या दादर पोलीस स्टेशनला दाखल झाल्या आहेत.
काय आहे आरोप- किशोरी पेडणेकर यांनी २०१७ साली निवडणुकीमध्ये आपल्या शपथपत्रात एसआरएचा पत्ता दिला आहे. इमारत क्रमाक २, वरळी गोमाता जनता एसआरएमध्ये राहत असल्याचे त्यांनी आपल्या शपथपत्रात लिहिलेले आहे. पेडणेकर यांनी अर्धा डझन गाळे हस्तगत केले आहेत. त्याचा हिशोब घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे गाळे ढापले आहेत. आम्ही तुम्हाला गाळे देऊ, असे म्हणत लोकांकडून पैसे वसूल करण्यात आले. यासंदर्भातच दादर पोलीस ठाण्याकडून चौकशी सुरू आहे. मी किशोरी पेडणेकर यांचे नाव दिलेले नाही. तर जे लोक फसलेले आहेत, त्यांनीच पेडणेकर यांचे नाव घेतले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना न्यू मरीन लाईन पोलीस ठाण्यानेही या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे, अशी माहिती सोमैय्या यांनी नुकतेच दिली आहे.
तर त्या गाळ्याला टाळे लावा - मुंबईच्या माजी महापौरी किशोरी पेडणाकर म्हणाल्या, की किरीट सोमैय्या ( kishori pednekar SRA Scam ) हे दरवेळी प्रत्येक गोष्टींला विरोधकांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करतात. एसआरएने आधीच कळवलं आहे की माझा संबंध नाही. तरीही वारंवार दबाव तत्रांचा वापर सुरू आहे. एका सामान्य महीलेला तुमचा एक माणुस त्रास देतोय. गोमातानगरमध्ये मी २०१७ ला अर्ज भरला होता. कारण नसताना रान उठवले आहे. गोमातानगरमध्ये काही दुकाने आणि बालवाड्या सोसायटीच्या ताब्यात आहेत. येथे भाड्याने राहणे गुन्हा होता का ? असा प्रश्न विचारत जर गोमाता नगरमधील एक जरी गाळेधारक बोलला की गाळा किशोरी पेडणेकर यांचा आहे तर त्या गाळ्याला टाळे लावा, असे आवाहन किरीट सोमैय्या यांच्यासह मुख्यमंत्र्यांना केले आहे.